मराठा आंदोलनातील मृतांच्या कुटुंबीयांना मिळणार अर्थसहाय्य

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येक कुटुंबाला दहा लाख रुपये देण्याचे आदेश

मराठा आंदोलनातील मृतांच्या कुटुंबीयांना मिळणार अर्थसहाय्य

मुंबई: प्रतिनिधी 

मनोज जरांगे पाटील यांना दिलेल्या आश्वासनानुसार मराठा आंदोलनातील मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी दहा लाख रुपये देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. 

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी ज्यांनी स्वतःचे प्राण अर्पण केले किंवा आंदोलनादरम्यान ज्यांचा मृत्यू झाला अशा तरुणांच्या कुटुंबांना आर्थिक सहाय्य द्यावे, अशी मागणी जरांगे पाटील यांनी सरकारकडे केली होती. सरकारने ती मान्य ही केली होती. त्यानुसार त्याच्या अंमलबजावणीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. 

मराठा आंदोलनादरम्यान एकूण सात जणांचा मृत्यू झाला. त्यात सातही कुटुंबीयांना एकूण 70 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून करण्यात येणार आहे. 

हे पण वाचा  पार्थ पवार यांनी घेतली संजोग वाघेरे यांची भेट

About The Author

Advertisement

Latest News

मराठा आंदोलनातील मृतांच्या कुटुंबीयांना मिळणार अर्थसहाय्य मराठा आंदोलनातील मृतांच्या कुटुंबीयांना मिळणार अर्थसहाय्य
मुंबई: प्रतिनिधी  मनोज जरांगे पाटील यांना दिलेल्या आश्वासनानुसार मराठा आंदोलनातील मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी दहा लाख रुपये देण्याचे...
छगन भुजबळ हे भाजपचे प्यादे: संजय राऊत
'हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा निर्णय घाईने आणि दबावाखाली'
'... तर दोन समाजांमध्ये लागतील भांडणे'
मोठ्या स्फोटकांसह पाकिस्तानी दहशतवादी भारतात
केवळ परिस्थिती चिघळू नये म्हणून...
'अजित पवार यांना नाही सत्तेत राहण्याचा अधिकार'

Advt