'अजित पवार यांना नाही सत्तेत राहण्याचा अधिकार'

महिला पोलीस अधिकाऱ्याला धमकी दिल्याबद्दल राऊत यांची टीका

'अजित पवार यांना नाही सत्तेत राहण्याचा अधिकार'

मुंबई: प्रतिनिधी 

स्वतः शिस्तप्रिय असल्याचा आव आणणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या गावगुंड कार्यकर्त्यांना संरक्षण देण्यासाठी महिला पोलीस अधिकाऱ्यांना दमदाटी केली. त्यांना सत्तेत राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. आपल्या गुंड प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांना संरक्षण देण्यासाठीच अजित पवार यांना सत्तेत राहायचे आहे, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली. 

माढा तालुक्यातील कुर्डू या गावात अवैधपणे मुरमाचे उत्खनन सुरू असताना त्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महिला आयपीएस अधिकारी अंजली कृष्णा यांना अजित पवार यांनी कारवाई थांबवण्याचे आदेश मोबाईल वरून दिले. उलट अंजली कृष्णा यांच्यावरच कारवाई करण्याची धमकी दिली, असे आरोप राऊत यांनी केले आहे. या संभाषणाचे रेकॉर्डिंग समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. त्यामुळे अजित पवार यांना मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले आहे. 

पुण्यातील मावळ मध्ये आमदार सुनील शेळके यांचे बेकायदेशीर दगड खाणीचे प्रकरण मी बाहेर काढले होते. सरकारला कोट्यावधीचा चुना लावणाऱ्या शेळके यांना पवार यांनी पाठीशी घातले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांचेही कार्यकर्ते गुन्हेगार, लुटारू, बलात्कारी आणि भ्रष्टाचारी आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला. अवैध खाणकाम करणे म्हणजे सरकारी खजिन्याला चुना लावण्यासारखे आहे. अजित पवार स्वतः अर्थमंत्री आहे. त्यांच्याकडूनच सरकारी खजिना लुटण्यास प्रोत्साहन दिले जात आहे त्यामुळे त्यांना सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नाही, असे ते म्हणाले. 

हे पण वाचा  मराठा आरक्षणाचा शासन आदेश बेकायदेशीर 

तुम्ही चोरांचे सरदार 

खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवार यांच्यावर 70 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला. आता ते अजित पवार तरुण महिला आयपीएस अधिकाऱ्याला दमदाटी करत आहेत. बेकायदेशीर बाबी दुर्लक्षित करायला सांगत आहेत. एरवी इतरांना कायदा शिकवणारे, 'बघून घेतो,' म्हणणारे अजित पवार स्वतः बेकायदेशीर गोष्टींची पाठराखण करत आहेत. अजित पवार तुम्ही चोरांचे सरदार आहात, असा आरोप राऊत यांनी केला. अर्धा महाराष्ट्र लुटला आहे. उर्वरित महाराष्ट्र त्यांच्या हस्तकांनी लुटावा यासाठी ते प्रशासनावर दबाव आणत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. 

 

About The Author

Advertisement

Latest News

मराठा आंदोलनातील मृतांच्या कुटुंबीयांना मिळणार अर्थसहाय्य मराठा आंदोलनातील मृतांच्या कुटुंबीयांना मिळणार अर्थसहाय्य
मुंबई: प्रतिनिधी  मनोज जरांगे पाटील यांना दिलेल्या आश्वासनानुसार मराठा आंदोलनातील मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी दहा लाख रुपये देण्याचे...
छगन भुजबळ हे भाजपचे प्यादे: संजय राऊत
'हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा निर्णय घाईने आणि दबावाखाली'
'... तर दोन समाजांमध्ये लागतील भांडणे'
मोठ्या स्फोटकांसह पाकिस्तानी दहशतवादी भारतात
केवळ परिस्थिती चिघळू नये म्हणून...
'अजित पवार यांना नाही सत्तेत राहण्याचा अधिकार'

Advt