- देश-विदेश
- राहुल गांधी यांच्या जीविताला धोका असल्याबाबतचा अर्ज वकिलांकडून मागे
राहुल गांधी यांच्या जीविताला धोका असल्याबाबतचा अर्ज वकिलांकडून मागे
सात्यकी सावरकर यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान कार्यवाही
पुणे: प्रतिनिधी
लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या जीवाला विरोधी विचारसरणीच्या लोकांकडून धोका होण्याची शक्यता वर्तवणारा पुणे न्यायालयात दाखल केलेला अर्ज गांधी यांचे वकील ॲड. मिलिंद पवार यांनी मागे घेतला आहे.
सात्यकी सावरकर हे महात्मा गांधी खून खटल्यातील मुख्य आरोपी नथुराम गोडसे आणि गोपाळ बोरसे यांचे पणतू आहेत. यापूर्वी सत्तारूढ भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी, राहुल गांधी यांचा शेवट त्यांच्या आजी इंदिरा गांधी यांच्याप्रमाणे होईल, असे विधान केले होते. दुसऱ्या एका खासदारांनी राहुल गांधी हे दहशतवादी असल्याचा आरोप केला होता.
राहुल गांधी यांनी नुकताच निवडणूक आयोगाकडून करण्यात आलेल्या मतदान घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोग कार्यालयावर विरोधी पक्षाच्या खासदारांचा भव्य मोर्चाही काढण्यात आला. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांच्या जीवाला धोका होऊ शकतो, हे निदर्शनास आणून देणारा अर्ज वकील मिलिंद पवार यांनी केला होता. मात्र आज सुधारित अर्ज दाखल करून त्यांनी हा अर्ज मागे घेण्याची विनंती न्यायालयाला केली. ती न्यायालयाने मान्य केली आहे.