सर्व विमानतळांना अतिदक्षतेचा आदेश

सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रवाशांच्या सामानासह कर्मचाऱ्यांची कसून तपासणी करण्याची सूचना

सर्व विमानतळांना अतिदक्षतेचा आदेश

मुंबई: प्रतिनिधी 

गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार विमानतळांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या ब्युरो ऑफ सिविल एव्हिएशन सिक्युरिटीने देशभरातील विमानतळांना अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. विमानतळावरील सुरक्षा व्यवस्था वाढवण्याबरोबरच प्रवासी, त्यांच्याकडील सामान व कर्मचाऱ्यांची देखील कडक तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

दहशतवादी कारवाया किंवा देशविरोधी घटकांकडून घातपाताचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता लक्षात घेऊन ब्युरोने विमानतळांना अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. विमानतळ परिसर, धावपट्ट्या, हेलिपॅड्स, विमान प्रशिक्षण संस्था. अशा सर्व ठिकाणी सुरक्षा वाढविण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. 

विमानतळावरील सीसी टीव्ही यंत्रणेवर बारकाईने लक्ष ठेवावे, सुरक्षा यंत्रणांनी स्थानिक पोलिसांच्या संपर्कात राहावे, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या सामानाची व कर्मचाऱ्यांची तपासणी काटेकोरपणे करण्यात यावी, अशा सूचना विमानतळ व्यवस्थापनांना देण्यात आल्या आहेत. 

हे पण वाचा  'देशाला सक्षम पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांची आवश्यकता'

About The Author

Advertisement

Latest News

Advt