'डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळावा'

लाचार पाकिस्तानने मांडला अधिकृतपणे प्रस्ताव

'डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळावा'

इस्लामाबाद: वृत्तसंस्था 

भारत आणि पाकिस्तान या अण्वस्त्रधारी देशांमधील संघर्ष संपुष्टात आणण्यासह जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी महत्त्वपूर्ण प्रयत्न केले असून त्यांना शांततेसाठी नोबेल पुरस्कार मिळावा, असा अधिकृत प्रस्ताव लाचार पाकिस्तानने मांडला आहे. पाकिस्तानच्या या कोलांटी उडीमुळे पाक लष्कर प्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर आणि ट्रम्प यांच्यातील जेवणावळी मागचे रहस्य उघड झाले आहे. 

भिकेचा कटोरा घेऊन दारोदारी फिरणाऱ्या पाकिस्तानला सध्याच्या काळात चीन दाद देत नसल्यामुळे पाकिस्तान पुन्हा एकदा अमेरिकेच्या वळचणीला जाऊन बसला आहे. अमेरिकेने देखील पाकिस्तानची हतबल अवस्था लक्षात घेऊन पाकिस्तानला पुन्हा एकदा आपल्या हातचे बाहुले बनवण्यासाठी पावले उचलली आहेत. फिल्ड मार्शल मुनीर आणि यांच्या मेजवानीच्या वेळी अमेरिकेने काही लालूच दाखवल्यामुळेच पाकिस्तानने ट्रम्प यांच्यासारख्या आततायी व्यक्तीला शांततेचा नोबेल पुरस्कार देण्याचा प्रस्ताव मांडल्याची टीका खुद्द पाकिस्तानातील बुद्धिजीवी वर्गाकडून केली जात आहे. 

ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारत आणि पाकिस्तानच्या विरोधात उघडलेली आघाडी मागे घेण्याचे श्रेय डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पदरी पाडून घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, दोन्ही देशांनी त्याचा इन्कार केला. तरीदेखील ट्रम्प हे वारंवार आपल्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष संपुष्टात आल्याचा दावा करीत आहेत. 

भारत आणि पाकिस्तान संघर्षाशिवाय काँगो आणि रवांडा, सर्वया आणि कोसोवा, इजिप्त आणि इथिओपिया या देशांमधील संघर्ष आपल्यामुळेच निवडल्याचा ट्रम्प यांचा दावा आहे. त्यामुळेच सन 2026 च्या नोबेल शांतता पुरस्कारावर त्यांचा डोळा आहे. मात्र, हा पुरस्कार आपल्याला मिळणार नाही, याची त्यांना खात्री आहे. त्यामुळेच ट्रम्प यांनी पाकिस्तानला पुढे करून आपल्या नावाचा प्रस्ताव मांडल्याची चर्चा आहे. 

प्रत्यक्षात दीर्घकाळ चाललेल्या रशिया आणि युक्रेन संघर्षात ट्रम्प यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला काडीचेही यश मिळाले नाही. एकीकडे अमेरिका इराण बरोबर वाटाघाटी करण्याच्या प्रयत्नात असताना अमेरिकेचा कनिष्ठ मित्र असलेल्या इस्राईलने अमेरिकेला न जुमानता इराणवरील आपले हल्ले सुरूच ठेवले आहेत. आपला शस्त्रास्त्रांचा व्यापार वाढविण्यासाठी जगभर युद्धजन्य परिस्थिती कायम ठेवणारी अमेरिका जगभरच्या दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानला शांततेच्या पुरस्काराचा प्रस्ताव सादर करायला भाग पाडते हा प्रकार जगभरात हास्यास्पद ठरला आहे. 

About The Author

Advertisement

Latest News

सातारा पोलीस दलासाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव? सातारा पोलीस दलासाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव?
सातारा, प्रतिनिधि  सातारा शहराची वाढती लोकसंख्या गुन्हेगारी वाहतूक समस्येच्या पार्श्वभूमीवर येत्या काळामध्ये सातारा पोलिस दलात किमान पहिल्या टप्प्यात ४००० नव्या...
मन की बात" मध्ये जुन्नरच्या रमेश खरमाळे यांच्या कामाचा गौरव
कळंब येथे आंबेडकर स्मारक उभारणार - गौतम खरात  
भाजपचे आमदार अमित गोरखे यांची महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 'तालिका सभापती' पदी निवड!
चाकण औद्योगिक परिसरात मिनी कार्गो एअरपोर्ट उभारण्यासाठी हवाई वाहतूक मंत्री यांना निवेदन!
शेतकऱ्यांचा काटा मारणाऱ्या केळी व्यापाऱ्यांचा काटा काढू - अतुल खूपसे पाटील
रत्नप्रभादेवी मोहिते पाटील बीज उत्पादक सह संस्थेच्या तज्ञ संचालक पदी पंडित मिसाळ!

Advt