चर्चच्या परिसरात सापडले हिंदू मंदिराचे अवशेष

चर्चकडून स्थानिकांना धार्मिक विधी करण्याची मुभा

चर्चच्या परिसरात सापडले हिंदू मंदिराचे अवशेष

त्रिवेंद्रम: वृत्तसंस्था 

सध्या देशाच्या अनेक भागात प्रार्थनास्थळांवरून तणाव निर्माण होत असल्याचे चित्र दिसत असताना केरळमधील हिंदू आणि ख्रिश्चन समुदायाने परस्पर सौहार्दाचे उदाहरण घालून दिले आहे. चर्चच्या जागेत आढळून आलेल्या हिंदू मंदिराच्या अवशेषांच्या जागी धार्मिक विधी करण्याची मुभा चर्चकडून स्थानिक नागरिकांना देण्यात आली आहे. 

पलाय येथे चर्चच्या ताब्यात असलेल्या जमिनीवर कसावाची (साबुदाणा बनविण्यासाठी याच्या मुळांचा चीक वापरला जातो) शेती करण्यासाठी नांगरणी केली जात असताना या जमिनीत शिवलिंग व मंदिराचे अवशेष आढळून आले. स्थानिक नागरिकांनी या ठिकाणापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या श्री वनदुर्गा भगवती समितीच्या पदाधिकाऱ्यांना त्याबद्दल माहिती दिली. 

समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पलाय बिशप हाऊसच्या धर्मगुरूंची भेट घेतली. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन त्या ठिकाणी देव प्रसन्नम् हा धार्मिक विधी करण्याची मुभा दिली. बिशप हाऊसचे चान्सलर फादर जोसेफ यांनी चर्चच्या जमिनीत हिंदू मंदिराचे अवशेष सापडले असल्याला दुजोरा दिला. स्थानिक हिंदू समुदायाशी चर्चचे सौहार्दपूर्ण संबंध असून ते यापुढे देखील कायम राखले जातील, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली. 

हे पण वाचा  पंतप्रधान मोदी यांचे आगमन ही आमच्यासाठी अभिमानाची बाब

फादर जोसेफ म्हणाले की, या जागेत पूर्वी मंदिर असल्याचे अनेक जुने लोक सांगत असत. ही जमीन पूर्वी एका ब्राह्मण कुटुंबाकडे होती. त्यानंतर अनेकांकडे हस्तांतरण होत ती चर्चकडे आली. हे मंदिर सुमारे 100 वर्षांपूर्वी नष्ट झाल्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले. 

 

Tags:

About The Author

Advertisement

Latest News

आरक्षणाच्या मागणीसाठी 29 ऑगस्टला मंत्रालयावर मराठा मोर्चा आरक्षणाच्या मागणीसाठी 29 ऑगस्टला मंत्रालयावर मराठा मोर्चा
परभणी: प्रतिनिधी मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गातून सरसकट आरक्षण देण्यात यावे आणि सगेसोयरेच्या अध्यादेशाची अंमलबजावणी व्हावी, या प्रमुख मागण्यासाठी पुन्हा...
'... तर विकासकांवर कठोर कारवाई करू'
सार्वजनिक गणेशोत्सवाला महाराष्ट्र महोत्सव घोषित केल्याबद्दल जल्लोष
देहूरोड‘रेड झोन’मधील समस्यांबाबत लवकर निर्णय-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मावळातील पीएमआरडीए क्षेत्रातील नियमबाह्य गृहप्रकल्पांवर कारवाई
वडगावातील धोकादायक बनलेल्या ‘या’ ड्रेनेज चेंबरच्या दुरुस्तीची मागणी
'ठाकरे यांचा हिंदी विरोध सत्तालालसे पोटीच'

Advt