- देश-विदेश
- राजधानी दिल्ली दुमदुमली रेल्वे कामगारांच्या आवाजाने
राजधानी दिल्ली दुमदुमली रेल्वे कामगारांच्या आवाजाने
खासगीकरण व NPS विरोधात आंदोलन
नवी दिल्ली : प्रतिनिधी
दिल्लीतील कर्नैलसिंह स्टेडियम रेल्वे कामगारांच्या घोषणांनी आणि टाळ्यांच्या गजराने दुमदुमले आहे. इंडियन रेल्वेमन फेडरेशन (NFIR) आणि उत्तर रेल्वे मजदूर युनियन (URMU) यांच्या ३१ व्या राष्ट्रीय अधिवेशनाला सुरुवात झाली असून, देशभरातून जवळपास १५,००० रेल्वे कर्मचारी सहभागी झाले आहेत.
या अधिवेशनात खासगीकरण, कॉर्पोरेटकरण व आऊटसोर्सिंगला विरोध, जुनी निवृत्तीवेतन योजना (OPS) पुन्हा लागू करणे, तसेच कंत्राटी कामगारांचे नियमीकरण हे मुद्दे प्रमुख्याने मांडले जात आहेत. आपल्या मागण्यांवर ठाम असलेल्या कामगारांनी सरकारला इशारा दिला आहे की मागण्या न मानल्यास लढा अधिक तीव्र केला जाईल.
रेल्वे कामगारांच्या प्रमुख मागण्या
खासगीकरण व आऊटसोर्सिंगवर बंदी
OPS पुन्हा लागू करणे व NPS रद्द करणे
रिक्त पदांची भरती व कंत्राटी कामगारांचे नियमीकरण
महिला कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षाव्यवस्था व सुविधा वाढवणे
गट ‘D’ मधील सर्व कर्मचाऱ्यांची गट ‘C’ मध्ये बढती
आरोग्य सेवा बळकट करणे व उत्पादन युनिट्स व रेल्वे रुग्णालयांच्या खासगीकरणाला विरोध
डॉ. एम. राघवैय्या, सरचिटणीस, NFIR
“भारतीय रेल्वे कामगारांशिवाय पुढे जाऊ शकत नाही. सरकारने आमच्या मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा संघर्ष आणखी वाढेल.”
श्री. गुमान सिंह, अध्यक्ष, NFIR:
“रेल्वेचे खासगीकरण हे कामगार आणि जनतेसाठी धोकादायक आहे. हे अधिवेशन कामगारांच्या ऐक्याचा ताकदवान संदेश देत आहे.”
श्री. बी.सी. शर्मा, सरचिटणीस, URMU:
“उत्तर रेल्वे मजदूर युनियनने नेहमीच कामगारांचा आवाज बुलंद केला आहे. OPS ची पुनर्स्थापना आणि कंत्राटी कामगारांचे नियमीकरण ही आमची सर्वात महत्त्वाची प्राधान्ये आहेत.”
साक्षी मल्लिक:
“हे अधिवेशन कामगारांच्या ताकदीचे आणि ऐक्याचे प्रतीक आहे. खासगीकरण आणि अन्यायकारक धोरणांविरोधात आपला संघर्ष सुरूच ठेवावा लागेल. हाच विजयाचा खरा मार्ग आहे. “आज माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय वाढदिवस आहे, कारण मी तो संघर्षरत रेल्वे कामगारांसोबत साजरा केला. हेच माझे कुटुंब आहे, हीच खरी ताकद आहे.”
अधिवेशनादरम्यान भावनिक क्षण घडला, जेव्हा स्टेडियम प्रभारी साक्षी मल्लिक यांनी रेल्वे कामगारांसोबतच आपला वाढदिवस साजरा केला. कामगारांनी टाळ्या व घोषणांनी त्यांचे स्वागत केले.