- राज्य
- मंदिराच्या बंद दारावर लाथा मारत भाविकाचा गोंधळ
मंदिराच्या बंद दारावर लाथा मारत भाविकाचा गोंधळ
बारा ज्योतिर्लिंगांपैकी त्र्यंबकेश्वर मंदिरात घडला प्रकार
नाशिक: प्रतिनिधी
देशभरातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात गर्दी झाल्यामुळे बंद केलेल्या प्रवेशद्वारावर लाथा मारून एका भाविकाने गोंधळ घातला. बेभान झालेल्या या भाविकाला अखेर सुरक्षारक्षकांनी चांगलाच वठणीवर आणला.
पवित्र श्रावण महिना सुरू असल्यामुळे चंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी होत आहे. दररोज तब्बल एक लाख भाविक दर्शनासाठी येत आहेत. गर्दी नियंत्रित करण्यासाठी मंदिराचे प्रवेशद्वार बंद केलेल्या असताना परराज्यातून आलेल्या एका भाविकाने बंद दारावर लाथा मारत गोंधळ घालायला सुरुवात केली. त्याला समजावण्याचा प्रयत्न करीत असता त्याने सुरक्षारक्षकांनाच धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सुरक्षारक्षकांनी त्याला चांगलाच चोप दिला.
एवढ्यावरच न थांबता त्या मुजोर व्यक्तीच्या कुटुंबीयांनी सुरक्षारक्षक मारहाण करीत असल्याचे चित्रण व्हायरल करायला सुरुवात केली. मग देवस्थानाने देखील मंदिराच्या दारावर लाथा मारत असतानाचे चित्र व्हायरल करण्याचा इशारा दिला. अखेर त्याच्या कुटुंबीयांनी माफी मागितल्याने पोलिसांनी त्याला समज देऊन सोडून दिले.