विद्यार्थी आक्रमक: अभियांत्रिकीच्या निकालात घोळ असल्याचा आरोप

पुन्हा परीक्षा घेण्यात यावी आणि कॅरी ऑन सुविधा मिळावी या प्रमुख मागण्या

विद्यार्थी आक्रमक: अभियांत्रिकीच्या निकालात घोळ असल्याचा आरोप

पुणे: प्रतिनिधी 

नुकत्याच जाहीर झालेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभियांत्रिकी अभ्यासक्रम परीक्षेच्या निकालात अनेक घोळ झाले असून या अभ्यासक्रमाची पुन्हा परीक्षा घेण्यात यावी आणि एखाद्या विषयामुळे वर्ष वाया जाऊ नये यासाठी कॅरी ऑन सुविधा देण्यात यावी, ही विद्यार्थ्यांची मागणी आहे. 

आपल्या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी विद्यार्थी पुणे विद्यापीठातील कुलगुरू कार्यालयासमोर जमले. विद्यार्थ्यांना दहा मिनिटे भेटीसाठी वेळ दिली होती. मात्र, विद्यार्थ्यांना भेटले नाहीत. त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठ इमारतीसमोरील बॅरिकेड्स पाडून विद्यार्थी इमारतीत शिरण्याचा प्रयत्न करत होते.

त्यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीने विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाला कुलगुरूंच्या भेटीसाठी पाठविण्यात आले आहे. आता शिष्टमंडळ आणि कुलगुरू यांच्यात काय चर्चा होते आणि कुलगुरू विद्यार्थ्यांच्या मागण्यांना काय प्रतिसाद देतात, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष आहे. 

हे पण वाचा  देहूरोड‘रेड झोन’मधील समस्यांबाबत लवकर निर्णय-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

About The Author

Advertisement

Latest News

विद्यार्थी आक्रमक: अभियांत्रिकीच्या निकालात घोळ असल्याचा आरोप विद्यार्थी आक्रमक: अभियांत्रिकीच्या निकालात घोळ असल्याचा आरोप
पुणे: प्रतिनिधी  नुकत्याच जाहीर झालेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभियांत्रिकी अभ्यासक्रम परीक्षेच्या निकालात अनेक घोळ झाले असून या अभ्यासक्रमाची पुन्हा...
मोदी @11 अभियनाअंतर्गत प्रबोधन कार्यक्रम आणि वृक्षारोपण 
'अर्ज, विनंत्या बंद करा, ऑगस्ट महिन्यात निकाल देऊ'
'गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचे भाजपने द्यावे स्पष्टीकरण'
गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा सर्वपक्षीय नेत्यांकडून निषेध
... म्हणून कार्यकर्ते भाजपमध्ये येतात: बावनकुळे
'केवळ काळे फासण्याचा नव्हे तर जीव घेण्याचा कट'

Advt