'राज ठाकरेंची इच्छा ती माझी इच्छा, पुढाकार कोणीही घ्यावा'

शिवसेना ठाकरे गट व मनसेच्या युतीबाबत अमित ठाकरे यांचे वक्तव्य

'राज ठाकरेंची इच्छा ती माझी इच्छा, पुढाकार कोणीही घ्यावा'

मुंबई: प्रतिनिधी 

शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातील युतीबाबत मनसे प्रमुख राज ठाकरे यांची जी इच्छा, तीच माझी इच्छा! त्यासाठी पुढाकार कोणीही घ्यावा. मी घेऊ शकत नाही, असे वक्तव्य मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी काढले. 

दोघा ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता अमित ठाकरे म्हणाले की, दोन्ही भावांनी एकत्र येण्यास आपला कोणताही. आक्षेप नाही. त्याबद्दल त्या दोघांनी एकमेकाशी बोलून निर्णय घ्यावा. दोघांकडे एकमेकांचे संपर्क क्रमांक आहेत.

सकाळी उठून बोलणारे... 

हे पण वाचा  Karad News | ‘कृष्णा विद्यापीठ’ गुणवत्तापूर्ण शिक्षणाची ओळख - राज्यपाल राधाकृष्णन

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना मात्र अमित ठाकरे यांनी नाव न घेता खोचक टोला लगावला. रोज सकाळी उठून बोलणारे नेमके कोणाला फसवत आहेत, असा बोचरा सवाल त्यांनी केला. 

पूर्वानुभवामुळे मनसेची सावध भूमिका

चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या youtube वाहिनीवर दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे यांनी केलेल्या एका विधानावरूनच ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना वेग आला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील आमच्यातील मतभेदापेक्षा महाराष्ट्राचे आणि मराठी माणसाचे हित अधिक महत्त्वाचे असल्याचे सांगत युती बबत अनुकूलता व्यक्त केली. नुकतेच डोंबिवली येथील पलावा पुलासाठी शिवसैनिक आणि मनसैनिक यांनी एकत्र आंदोलन केले. त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी देखील उद्धव ठाकरे यांची री ओढली. मात्र, यापूर्वीच्या काळात मनसेने पुढाकार घेऊनही उद्धव ठाकरे यांच्याकडून त्याला प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना ठाकरे गट आणि मनसे यांच्या युतीच्या चर्चांनी जोर धरला असला तरी देखील मनसेची भूमिका काहीशी सावध असल्याचे दिसून येत आहे. 

About The Author

Advertisement

Latest News

शिव शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा स्मरण करून सर्वांनी पुढे गेले पाहिजे-उपमुख्यमंत्री अजित पवार शिव शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा स्मरण करून सर्वांनी पुढे गेले पाहिजे-उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे - छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श व कर्तुत्वाची सर्वांनी आठवण ठेवून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ....
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी दिली बार्टी संस्थेस भेट
दिव्यांगाची परवड थांबणार कधी; दिव्यांग व्यक्ती संघटनेचे पदाधिकारी ज्ञानदेव कदम!
नॅशनल पार्क झोपडीवासीयांचा वनवास २५ वर्षे झाली तरी संपेना 
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन साजरा  
स्वेच्छेने केलेल्या धर्मांतराला विरोध नसावा: सरसंघचालक
जगद्गुरु तुकोबाराय यांची पालखी बोपोडीत अधिक काळ विसावणार

Advt