शिवसेना ठाकरे गटाचे पाच खासदार शिंदे गटाच्या संपर्कात

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बसणार मोठा धक्का?

शिवसेना ठाकरे गटाचे पाच खासदार शिंदे गटाच्या संपर्कात

मुंबई: प्रतिनिधी 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना शिवसेना ठाकरे गटातील पाच खासदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेना शिंदे गटाच्या वरिष्ठ सूत्रांनी केला आहे. या खासदारांना संसदेच्या २७ जुलै रोजी सुरू होणाऱ्या अधिवेशनापूर्वी किंवा अधिवेशनादरम्यान शिंदे गटात प्रवेश दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले. मात्र, या खासदारांना थांबवण्यासाठी ठाकरे गटाकडून आटोकाट प्रयत्न केले जात आहेत. 

लोकसभा निवडणुकीत ठाकरे गट आणि एकूणच महाविकास आघाडीला उल्लेखनीय यश मिळाल्याने सर्वच घटक पक्षांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, विधानसभा निवडणुकीत आघाडीला सपशेल पराभव पत्करावा लागला. त्यामुळे आघाडीतील घटक पक्षांना, विशेषतः ठाकरे गटाला उतरती कळा लागली. या पक्षातून मोठ्या प्रमाणावर 'आऊट गोईंग' सुरू आहे. 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन-चार महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. तशातच ठाकरे गटाचे पाच खासदार शिवबंधन उतरवून धनुष्यबाण हाती घेण्यासाठी उत्सुक आहेत. ते सातत्याने आपल्या संपर्कात आहेत, असा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. हा दावा प्रत्यक्षात उतरल्यास त्याचा मोठा फटका ठाकरे गटाला महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, ग्रामपंचायत या निवडणुकांमध्ये बसणार आहे. हे नुकसान टाळण्यासाठी कुंपणावरच्या खासदारांना पक्षात थांबवण्याचे प्रयत्न ठाकरे गटाकडून केले जात आहेत. ठाकरे गटाचे लोकसभेत नऊ तर राज्यसभेत दोन खासदार आहेत. 

हे पण वाचा  तुमच्या मंत्र्यांवर कारवाई, तर आमच्या... ही काय स्पर्धा आहे?

About The Author

Advertisement

Latest News

Advt