वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना मोठा दिलासा

आगामी पोलीस भरतीसाठी अर्ज करण्यासाठी परवानगी

वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना मोठा दिलासा

मुंबई: प्रतिनिधी 

विविध कारणांमुळे पोलीस भरती नाकारल्याने वयोमर्यादा संपुष्टात आलेल्या उमेदवारांनाही आगामी पोलीस भरतीसाठी अर्ज दाखल करण्यास पात्र ठरविणारा निर्णय गृहमंत्रालयाने घेतला आहे. त्यामुळे हजारो उमेदवारांना वय ओलांडूनही पोलीस भरतीसाठी संधी मिळणार आहे. 

सरकारने पोलीस दलात रिक्त असलेली सर्व पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी लवकरच तब्बल १५ हजार पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. कोरोना महामारी आणि इतर काही कारणांमुळे पोलीस भरती अनेक वर्ष रखडली आहे. या काळात भरतीसाठीची वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांची संख्या मोठी आहे. त्यांची संधी नाकारली जाऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 

पोलीस शिपाई पदासाठी १२ हजार ३९९, पोलीस शिपाई चालक २३४,  पोलीस दलाच्या बँडमध्ये वादकांच्या २५, सशस्त्र पोलीस शिपाई पदाच्या २ हजार ३९३, कारागृह शिपाई ५८० पदे अशी एकूण १५ हजार ६३१ पदे भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

हे पण वाचा  राज्यात ₹१ लाख ०८ हजार कोटींच्या गुंतवणुकीचे करार

About The Author

Advertisement

Latest News

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज
मुंबई: प्रतिनिधीउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नगर विकास विभागात सातत्याने होत असलेल्या कथित हस्तक्षेपामुळे नाराज असल्याची चर्चा...
'संजय राऊत यांच्या विरोधात कारवाई करा'
वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना मोठा दिलासा
मनोज राणे यांचा भाजपला राम राम
सीएफए इन्स्टिट्यूटतर्फे फायनान्स इंडस्ट्री नेटवर्क राउंडटेबलचे आयोजन
जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांसाठी आरक्षण जाहीर
हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेची मासिक बैठक संपन्न

Advt