एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज

शिवसेना शिंदे गटात देखील पक्षांतर्गत नाराजीनाट्य

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज

मुंबई: प्रतिनिधी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नगर विकास विभागात सातत्याने होत असलेल्या कथित हस्तक्षेपामुळे नाराज असल्याची चर्चा आहे. त्यातच महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिंदे यांना पक्षांतर्गत नाराजीला देखील तोंड द्यावे लागत आहे. 

राज्यातील अ, ब, क प्रवर्गातील महापालिकांमध्ये आयुक्त पदावर सनदी अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाते तर ड वर्गातील महापालिकांवर बिगरआयएएस अधिकारी नियुक्त केले जातात. मात्र, ड प्रवर्गातील महापालिकांच्या प्रशासकीय प्रमुख पदावर देखील आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. हा मुख्यमंत्र्यांनी आपल्या अखत्यारीत असलेल्या नगर विकास विभागात केलेला हस्तक्षेप आहे, अशी शिंदे यांची भावना असून त्यामुळे ते नाराज असल्याचे सांगितले जात आहे. शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये बिनसल्याच्या चर्चा या सरकारच्या स्थापनेपासूनच सुरू आहेत. मात्र, या दोन्ही नेत्यांनी वारंवार त्याचा इन्कार केला आहे. 

दुसरीकडे महापालिका निवडणुका तोंडावर आलेले असतानाच खुद्द मुंबईमध्येच विभाग प्रमुखांच्या नेमणुकांवरून शिंदे गटातच नाराजी असून ती जाहीरपणे व्यक्त देखील केली जात आहे. दक्षिण मुंबईच्या शिवडी विधानसभा मतदारसंघातील पाचपैकी चार शाखाप्रमुखांनी या नाराजीतून पक्षाचा राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे तर काही पदाधिकाऱ्यांनी सह्यांच्या मोहिमेद्वारे आपला विरोध व्यक्त करण्याचा इशारा दिला आहे.  शिवडी विभागाच्या विभाग प्रमुख पदी माजी नगरसेवक नाना आंबोले यांच्या नियुक्तीवर त्यांचा आक्षेप आहे. पश्चिम उपनगरातील नेमणुकांमुळेसुद्धा मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे. महापालिका निवडणूक शिंदे गटासाठी अत्यंत महत्त्वाची असून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही नाराजी शिंदे गटाला परवडणारी नाही. 

हे पण वाचा  "कुर्ला टू वेंगुर्ला"  चित्रपटाचा दमदार ट्रेलर  लाँच

About The Author

Advertisement

Latest News

Advt