- राज्य
- थोपटेसमर्थक विशाल कोंडेसह शेकडोचा राष्ट्रवादीत प्रवेश
थोपटेसमर्थक विशाल कोंडेसह शेकडोचा राष्ट्रवादीत प्रवेश
महामार्ग पट्ट्यात राजकीय वातावरण तापले
खेड शिवापूर: प्रतिनिधी
भोरमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. राजकीय हालचालींना वेग आला असतानाच माजी आमदार संग्राम थोपटे यांचे कट्टर समर्थक विशाल कोंडे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विद्यमान आमदार शंकर मांडेकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. यामुळे थोपटे यांना मोठा झटका बसल्याचे बोलले जात आहे.
भोर तालुक्यातील महामार्ग पट्ट्यातील माजी आमदार संग्राम थोपटे यांचे कट्टर समर्थक विशाल कोंडे आणि शेकडो कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्किट हाऊस पुणे येथे नुकतेच जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी आमदार शंकर मांडेकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजीत शिवतरे, माजी जिल्हा नियोजन सदस्य विक्रम खुटवड यांच्यासह पक्षाचे तालुका व जिल्हा स्तरावरील नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, विशाल कोंडे वेळू नसरापूर जिल्हा परिषद गटातील नसरापूर गणात पंचायत समितीसाठी ते प्रबळ इच्छुक आहेत. काही दिवसांपूर्वी केळवडे (ता. भोर) येथील विशाल कोंडे यांच्या ‘आखाड पार्टी’च्या कार्यक्रमातच माजी आमदार संग्राम थोपटे यांनी विशाल कोंडे यांना व्यासपीठावरून आगामी निवडणुकीत उमेदवारीबाबत थांबण्याचा मार्मिक सल्ला दिला होता. यावेळी विशाल कोंडे व उपस्थितीमध्ये नाराजी पसरली होती. याचा धागा पकडत विद्यमान आमदार शंकर मांडेकर यांनी त्याच व्यासपीठावरून कोंडे यांना आमच्या पक्षात या, आम्ही तुम्हाला निवडून आणतो आणि शेवटपर्यंत सोबत राहणार असल्याचा आत्मविश्वास मांडेकर यांनी विशाल कोंडे यांना दिला होता. भोर तालुक्यातील कांबरे खे. बा. गावांतील निलेश कोंढाळकर, सुशांत धनावडे, गणेश यादव, गणेश जाधव, प्रशांत मोहिते, प्रतिक शिंदे, दिपक शिंदे, विशाल काकडे, संतोष कोंढाळकर, देवाभाऊ कोंढाळकर, अमर कोंढाळकर, अविनाश मोहिते, गणेश यादव, कोंढाळकर, कुणाल यादव, अक्षय यादवसह आदींनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.
सामूहिक प्रवेशामुळे भाजपमध्ये खळबळ
सामूहिक प्रवेशामुळे तालुक्याच्या राजकारणात मोठी खळबळ निर्माण झाली असून, स्थानिक स्तरावर राष्ट्रवादीचा पगडा वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत. गावाच्या आणि पंचक्रोशीच्या सर्वांगीण विकासासाठी, ठोस निधी, प्रशासकीय पाठबळ आणि नेतृत्वासाठी आम्ही राष्ट्रवादीची वाट धरली पक्ष प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या.