- राज्य
- गुंडांनी फोडले सहकारनगर पोलिस ठाणे
गुंडांनी फोडले सहकारनगर पोलिस ठाणे
कायदा सुव्यवस्था स्थितीबाबत गंभीर प्रश्नचिन्ह
पुणे: प्रतिनिधी
कोंबिंग ऑपरेशनदरम्यान पकडून आणलेल्या गुंडाने आणि त्याच्या साथीदारांनी पोलिस ठाणेच फोडल्याचा प्रकार शहरातील सहकारनगर येथे घडला आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्था स्थितीबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
सराईत गुंड राजू उर्फ बारक्या लोंढे याला पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशनदरम्यान पकडून सहकारनगर पोलीस ठाण्यात आणले. त्याने व त्याच्या पाठोपाठ आलेल्या साथीदारांनी पोलीस ठाण्यातील खिडक्यांच्या काचा फोडल्या. फर्निचरची मोडतोड केली आणि संगणकही फोडून टाकला आहे.
विधानभवनात सत्ताधारी आमदार गोपीचंद पडळकर आणि विरोधी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या घटनेमुळे विरोधकांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टीकेचे लक्ष्य केले आहे. त्यातच पुण्यासारख्या शहरात गुंडांनी पोलीस ठाण्यातच तोडफोड केल्याने पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिला आहे का, असा सवाल केला जात आहे.