भाजपचे आमदार अमित गोरखे यांची महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 'तालिका सभापती' पदी निवड!

भाजपचे आमदार अमित गोरखे यांची महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 'तालिका सभापती' पदी निवड!

पिंपरी, प्रतिनिधि

पावसाळी अधिवेशन २०२५ च्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, भाजपचे अभ्यासू आणि नव-चर्चित तरुण आमदार श्री. अमित गोरखे यांची महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तालिका सभापतीपदी निवड करण्यात आली आहे. या नियुक्तीची अधिकृत घोषणा विधानपरिषद सभापती मा.राम शिंदे यांनी सभागृहात केली.

या निवडीवर प्रतिक्रिया देताना आमदार अमित गोरखे म्हणाले :
"मा. सभापती राम शिंदे यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास माझ्यासाठी अत्यंत सन्मानाची आणि जबाबदारीची बाब आहे. तालिका सभापतीपद ही केवळ एक पद नाही, तर विधानपरिषदेच्या कार्यवाहीतील शिस्त, प्रक्रियात्मक पारदर्शकता आणि संयमाचे प्रतिनिधित्व करणारी भूमिका आहे. या पदाचा योग्य मान राखण्यासाठी आणि सभागृहाच्या कार्यक्षमतेला चालना देण्यासाठी मी पूर्ण प्रामाणिकपणे योगदान देईन

"नवनिर्वाचित आमदार म्हणून सभागृहात माझे पदार्पण होत असतानाच मला हे पद मिळणे, हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. आपण माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, तो माझ्यासाठी अनमोल आहे. मी सभागृहातील सर्व सदस्यांचे मनःपूर्वक आभार मानतो, ज्यांनी या निवडीला सहमती दर्शवली."

"विशेषत: महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस यांचे मी मनापासून आभार मानतो. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि आशीर्वादामुळेच मी आज या जबाबदारीच्या ठिकाणी उभा आहे. आपण दाखवलेला विश्वास मी नक्कीच सार्थ ठरवीन."

000

About The Author

Advertisement

Latest News

सातारा पोलीस दलासाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव? सातारा पोलीस दलासाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव?
सातारा, प्रतिनिधि  सातारा शहराची वाढती लोकसंख्या गुन्हेगारी वाहतूक समस्येच्या पार्श्वभूमीवर येत्या काळामध्ये सातारा पोलिस दलात किमान पहिल्या टप्प्यात ४००० नव्या...
मन की बात" मध्ये जुन्नरच्या रमेश खरमाळे यांच्या कामाचा गौरव
कळंब येथे आंबेडकर स्मारक उभारणार - गौतम खरात  
भाजपचे आमदार अमित गोरखे यांची महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 'तालिका सभापती' पदी निवड!
चाकण औद्योगिक परिसरात मिनी कार्गो एअरपोर्ट उभारण्यासाठी हवाई वाहतूक मंत्री यांना निवेदन!
शेतकऱ्यांचा काटा मारणाऱ्या केळी व्यापाऱ्यांचा काटा काढू - अतुल खूपसे पाटील
रत्नप्रभादेवी मोहिते पाटील बीज उत्पादक सह संस्थेच्या तज्ञ संचालक पदी पंडित मिसाळ!

Advt