रत्नप्रभादेवी मोहिते पाटील बीज उत्पादक सह संस्थेच्या तज्ञ संचालक पदी पंडित मिसाळ!
On
अकलुज, वार्ताहर.
अकलूज येथील रत्नप्रभादेवी मोहिते पाटील बीज उत्पादक सहकारी संस्था या संस्थेच्या तज्ञ संचालक पदी वाघोली गावचे उपसरपंच पंडित विठ्ठल मिसाळ यांची तज्ञ संचालक पदी बिनविरोध निवड करण्यात आली असून सदर निवडीचे पत्र रत्नप्रभादेवी मोहिते पाटील बीज उत्पादक सहकारी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते निवडीचे पत्र देऊन पंडित मिसाळ यांचा सन्मान करण्यात आला.
सदर निवडी बद्दल माढा लोकसभेचे खा. धैर्यशील मोहिते पाटील, मराठा सेवा संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य उत्तमराव माने, वाघोली ग्रामपंचायतचे सरपंच अमोल मिसाळ, ग्रामपंचायत सदस्य व युवक नेते योगेश अण्णा माने शेंडगे, शंकर कारखान्याचे संचालक दत्तात्रय मिसाळ, वाघोली सोसायटीचे व्हा चेअरमन सुनील चव्हाण, संचालक चंद्रकांत मिसाळ,तुषार पाटोळे, वाफे गावचे उपसरपंच कुंडलिक गायकवाड, बाभुळगाव चे युवक नेते विनायक पराडे पाटील, माजी उपसरपंच कालिदास मिसाळ, सोसायटीचे माजी चेअरमन अशोक चव्हाण, अमोल मिसाळ पाटील यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या .
सदर वेळीउद्योजक गणेश मिसाळ बाळासाहेब मिसाळ, ग्रा प सदस्य अविनाश गाडे, राजेंद्र मिसाळ, वैभव मिसाळ, आदित्य मिसाळ कार्यकर्ते उपस्थित होते.
000
Tags: Mohite patil news
About The Author
Latest News
30 Jun 2025 14:54:20
सातारा, प्रतिनिधि
सातारा शहराची वाढती लोकसंख्या गुन्हेगारी वाहतूक समस्येच्या पार्श्वभूमीवर येत्या काळामध्ये सातारा पोलिस दलात किमान पहिल्या टप्प्यात ४००० नव्या...