कळंब येथे आंबेडकर स्मारक उभारणार - गौतम खरात  

कळंब येथे आंबेडकर स्मारक उभारणार - गौतम खरात  
महाळुंगे पडवळ
 
आंबेगाव तालुक्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक म्हणजेच सर्वसामान्य नागरिकांना ऊर्जा आणि प्रेरणा मिळण्याचे शक्तिस्थळ होणार आहे असे मत स्मारक समितीचे अध्यक्ष  गौतम खरात यांनी व्यक्त केले.
 
कळंब ता आंबेगाव येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक समितीची बैठक नुकतिच झाली या प्रसंगी कार्याध्यक्ष गौतमराव रोकडे  बाळासाहेब कानडे सचिव प्रकाश  सोनवणे सदस्य विठ्ठल दादा टिंगरे प्रकाश जेकटे  विकास साळवे सुजित फाले  सुरेश शिशुपाल दयानंद मोरे  खंडु थोरात गेनभाऊ मोरे गेनभाऊ वाघमारे संदेश साळवे तानाजी साळवे अनिता साळवे मनोज थोरत राजू वाघमारे विजय अभंग कृष्ण अभंग उपस्थित होते.
 
उपस्थितांच्या वतीने बुद्ध वंदना घेऊन भगवान गौतम बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमान मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले, या वेळी बोलताना गौतम खरात म्हणाले आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली  स्मारक होणार आहे  ते स्मारक निश्चितपणे सर्व सामान्य नागरिकांचे ऊर्जा आणि प्रेरणा मिळण्याचे शक्तिस्थळ असेल डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा हि या  स्मारक होणार आहे येथे  संविधानाची प्रत असेल  
 
समितीच्या वतीने सभासद नोंदणी अभियानाचा आढावा  घेण्यात आला जेष्ठ संचालक आनंद साळवे यांची तालुका  संघटक पदी सर्वानुमते निवड करण्यात आली आंबेगाव तालुक्यातील प्रत्येक कुटुंब आणि त्यातील सदस्य हे स्मारक समिती ला जोडण्यासाठी प्रत्येकाने कामाला लागले पाहिजे तशा प्रकारच्या जबाबदाऱ्या स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्याना देण्यात आल्या, कार्यक्रमाचे नियोजन  स्मारक समितीचे संचालक आनंदराव साळवे विकास साळवे  सुनीता साळवे यांनी केले होते.
 
प्रस्तावित प्रकाश सोनवणे यांनी केले सूत्रसंचालन आनंद साळवे यांनी केले आणि आभार विकास साळवे यांनी मानले.
 
000

About The Author

Advertisement

Latest News

सातारा पोलीस दलासाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव? सातारा पोलीस दलासाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव?
सातारा, प्रतिनिधि  सातारा शहराची वाढती लोकसंख्या गुन्हेगारी वाहतूक समस्येच्या पार्श्वभूमीवर येत्या काळामध्ये सातारा पोलिस दलात किमान पहिल्या टप्प्यात ४००० नव्या...
मन की बात" मध्ये जुन्नरच्या रमेश खरमाळे यांच्या कामाचा गौरव
कळंब येथे आंबेडकर स्मारक उभारणार - गौतम खरात  
भाजपचे आमदार अमित गोरखे यांची महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 'तालिका सभापती' पदी निवड!
चाकण औद्योगिक परिसरात मिनी कार्गो एअरपोर्ट उभारण्यासाठी हवाई वाहतूक मंत्री यांना निवेदन!
शेतकऱ्यांचा काटा मारणाऱ्या केळी व्यापाऱ्यांचा काटा काढू - अतुल खूपसे पाटील
रत्नप्रभादेवी मोहिते पाटील बीज उत्पादक सह संस्थेच्या तज्ञ संचालक पदी पंडित मिसाळ!

Advt