सातारा पोलीस दलासाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव?

उपलब्ध कर्मचारी यंत्रणेवर बंदोबस्ताचा दबाव, बेस्ट पोलिसिंगसाठी मनुष्यबळाची गरज

सातारा पोलीस दलासाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव?

सातारा, प्रतिनिधि 

सातारा शहराची वाढती लोकसंख्या गुन्हेगारी वाहतूक समस्येच्या पार्श्वभूमीवर येत्या काळामध्ये सातारा पोलिस दलात किमान पहिल्या टप्प्यात ४००० नव्या पोलिसांची भरती करणे गरजेचे होणार आहे. गुन्हे अन्वेषण आणि कायदा सुव्यवस्था याकरिता उपलब्ध २५५० या पोलिस कर्मचारी यंत्रणेवर बंदोबस्तासह इतर कामांचा प्रचंड दबाव पडत आहे. गृह विभागाकडे किमान पहिल्या टप्प्यांमध्ये दोन हजार पदांचा प्रस्ताव दिला जावा, अशी अपेक्षा आहे. ही पदे सामान्य भरती अथवा अनुकंपा तत्त्वावर करण्यात यावी अशी मागणी आहे.
 

सातारा जिल्ह्याची लोकसंख्या ही २९ लाखाच्या पलीकडे जाऊन पोहोचले आहे. तर सातारा शहराची लोकसंख्या ही एक लाख ८१,००० वर जाऊन पोहोचली आहे. सातारा जिल्हा हा चार कॅबिनेट मंत्र्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. कॅबिनेट मंत्र्यांचे प्रोटोकॉल मनुष्यबळाचा विचार करता पोलिस बंदोबस्त, वाहतूक नियमन, पोलीस मुख्यालय नियंत्रण पद्धती याशिवाय वेगवेगळ्या पोलिस बीटवर गुन्हे अन्वेषण करणे, पेट्रोलिंग याशिवाय आपत्कालीन स्थितीमध्ये ज्यादा मनुष्यबळ उपलब्ध करणे अशी प्रचंड कसरत सध्या पोलिस दलाला करावी लागत आहे. सातारा जिल्ह्याची लोकसंख्या तीस लाख अपेक्षित धरली आणि सातारा पोलिसांची संख्या केवळ २५५० ही गुणात्मक आकडेवारी मांडली, तर दहा हजार लोकसंख्येमागे केवळ एक पोलिस अशी प्रचंड तफावत आढळून येत आहे.

 राजकीय आग्रह धरण्याची सातारकरांची अपेक्षा
ठाणे व नागपूर पुणे या मोठ्या शहरांचा विचार करता सातारा जिल्ह्यात प्रतिव्यक्ती पोलिसांच्या भरतीचे प्रमाण अत्यंत कमी आहे. गृह विभागाला तसा स्वतंत्र प्रस्ताव पाठवण्याची आता गरज निर्माण झाली आहे. जिल्ह्याचा राजकीय दबदबा मंत्रिमंडळामध्ये पाहता केवळ राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून याबाबतची कार्यवाही तत्काळ होऊ शकते, असा राजकीय आग्रह खा. उदयनराजे भोसले यांनी धरावा अशी सातारकरांची अपेक्षा आहे.

 तंत्रज्ञानाचा करावा लागणार अधिक वापर
सातारा जिल्ह्यात मनुष्यबळ वाढल्यास गुन्हेगार नियंत्रण वाहतूक व्यवस्थापन स्थानिक ग्रस्त वाढवणे शक्य होणार आहे. सातारा शहरात शाहूपुरी व सातारा यांच्या व्यतिरिक्त अकरा पोलिस चौकी आहेत. याशिवाय सातारा एमआयडीसी विस्तारत असून एमआयडीसी क्षेत्र हे साडे दहा चौरस किलोमीटरच्या क्षेत्रात विस्तारले आहे. पोलिस कर्मचाऱ्यांवरील तणाव कमी होऊन कार्यक्षमता वाढवण्यास मदत होईल, असा विश्वास वरिष्ठ पोलिस अधिकारी व्यक्त करत आहेत. शहराचा विस्तार आणि नागरी समस्यांचा विचार करता पोलिस दलाचे बळ वाढवायला हवे, कर्मचारी संख्या वाढूनही आपल्याला तंत्रज्ञानाचा अधिक अधिक वापर करावा लागणार आहे, त्या दृष्टीने पावले उचलले जात आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

 शहराचा विस्तार व भविष्याची गरज ओळखून प्रस्ताव पाठविणार
सातारा शहर हे केवळ ऐतिहासिक शहर नसून तर पुणे बेंगलोर महामार्गावरील पश्चिम महाराष्ट्रातील मध्यवर्ती असलेले एक शहर आहे. सातारा जिल्ह्याचे नैसर्गिक दृष्ट्या असलेले महत्त्व आणि त्याची राजकीय संवेदनशीलता महत्त्वाची असून या दृष्टीने बेस्ट पॉलिशिंग आणि कायदा सुव्यवस्था सांभाळणे हा आमचा दृष्टिकोन असल्याची प्रतिक्रिया पोलिस अधीक्षक तुषार जोशी यांनी दिली. शहराचा विस्तार आणि भविष्यातील गरज ओळखून आणखी मनुष्यबळ तसेच बंदोबस्ताचे सुनियोजन या पद्धतीने स्वतंत्र प्रस्ताव गृह मंत्रालयाला पाठवण्याचे विचाराधीन असल्याचे स्पष्ट केले.  

000

हे पण वाचा  शर्मिला राजेश ननावरे यांना 'योगरत्न' पुरस्कार 

Tags:

About The Author

Advertisement

Latest News

सातारा पोलीस दलासाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव? सातारा पोलीस दलासाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव?
सातारा, प्रतिनिधि  सातारा शहराची वाढती लोकसंख्या गुन्हेगारी वाहतूक समस्येच्या पार्श्वभूमीवर येत्या काळामध्ये सातारा पोलिस दलात किमान पहिल्या टप्प्यात ४००० नव्या...
मन की बात" मध्ये जुन्नरच्या रमेश खरमाळे यांच्या कामाचा गौरव
कळंब येथे आंबेडकर स्मारक उभारणार - गौतम खरात  
भाजपचे आमदार अमित गोरखे यांची महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 'तालिका सभापती' पदी निवड!
चाकण औद्योगिक परिसरात मिनी कार्गो एअरपोर्ट उभारण्यासाठी हवाई वाहतूक मंत्री यांना निवेदन!
शेतकऱ्यांचा काटा मारणाऱ्या केळी व्यापाऱ्यांचा काटा काढू - अतुल खूपसे पाटील
रत्नप्रभादेवी मोहिते पाटील बीज उत्पादक सह संस्थेच्या तज्ञ संचालक पदी पंडित मिसाळ!

Advt