शेतकऱ्यांचा काटा मारणाऱ्या केळी व्यापाऱ्यांचा काटा काढू - अतुल खूपसे पाटील

प्रत्येक जण त्याला लुटणारा, फसवणारा आणि त्याला बळी पडणारा प्राणी म्हणजे "बळीराजा"!

शेतकऱ्यांचा काटा मारणाऱ्या केळी व्यापाऱ्यांचा काटा काढू - अतुल खूपसे पाटील
अकलुज, कृष्णा लावंड
 
शे--शेवटपर्यंत कष्ट करून 
त--तब्येतीचा विचार न करता 
क--कष्ट करणाऱ्याचा
री--रिकामा खिसा
ही वस्तुस्थिती आहे शेतकऱ्याची 
 
शेतकरी म्हटले की त्याला कोणीही जगू देत नाही भले व्यापारी असेल, वाहनधारक असेल ,तसेच पोलीस प्रशासन असेल कोणीही त्याला सोडत नाही, शेतकरी आपला रात्रंदिवस करून पोटच्या मुलाप्रमाणे जोपासलेले पीक अथवा धान्य बाजारात घेऊन जात असतो त्यावेळी सुरुवात पोलीस प्रशासनापासून होते शहराच्या बाहेर पोलीस दादा थांबलेले असतात ते गाडी अडवून त्याला त्रुटी दाखवतात गाडीचे पासिंग एवढे आहे या गाडीत ओव्हरलोड माल आहे तुम्हाला एवढे दंड भरावे लागेल तेवढे दंड भरावे लागेल म्हणून त्या वाहनधारकाला सळो की पळो करून सोडतात शेवटी त्या वाहनाबरोबर शेतकरीही त्याच वाहनात प्रवास करत असतो याप्रसंगी वाहनधारक ही शेतकऱ्यांनाच म्हणणार दादा हा दंड भरला पाहिजे अन्यथा माझ्या गाडीवर कारवाई होईल म्हणून चालक ही त्या दंडाची रक्कम शेतकऱ्याकडून घेत असतो हा झाला पहिला झटका त्यानंतर तो शेतकरी माल घेऊन मार्केटमध्ये गेला तर व्यापारी माल असाच आहे तसाच आहे मालात  हवाचं  आहे असे सांगून सोन्यासारखे मालाचे मातीमोल  किमत करून तो माल खरेदी करत असतो हा दुसरा झटका त्यानंतर फळबाग शेतकरी आपला केळी चा माल एखाद्या व्यापाऱ्याला विकत असतो मात्र तेथेही त्याची फसवणूक होते त्या व्यापाराकडे जे मालवाहतूक करणारे वाहन चालक असतात त्यांना तो व्यापारी हाताशी धरून ते वाहन टनेज काट्यावर घेऊन जातात आणि त्या रिकाम्या वाहनाचे वजन 2100 किलो वजन असेल तर तो व्यापारी शेतकऱ्याला रिकाम्या वाहनाचे वजन 2400 आहे असे सांगून इथेच शेतकऱ्याचा तीनशे किलो माल मारतो आणि मुळातच शेतकरी राजा हा प्रत्येकावर विश्वास ठेवणारा  सरळमार्गी असतो त्याच्या त्या विश्वासाला तडा देण्याचे काम व्यापारी करतात असे प्रकार सोलापूर जिल्ह्यासह करमाळा  तालुक्यातील कंदर  जेऊर  टेंभुर्णी   जिथे जिथे केळीच्या फळबागा आहेत तेथे तेथे हे प्रकार घडत आहेत यामध्ये वाहनधारकाचा काही फायदा नसतो कारण वाहनधारकाने खरे वजन शेतकऱ्यास सांगितले तर तो व्यापारी परत ते वाहन शेतीमालाच्या किंवा फळबागाच्या मालाला लावत नाही मुळातच मंदी असल्याने वाढते गाड्यांचे प्रमाण वाढती डिझेलची किंमत पाहता वाहनांना भाडे मिळत नसल्यामुळे निमुटपणे हे वाहन धारक गप्प बसतात असे प्रकार सर्रास घडत आहेत त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी बारकाईने लक्ष देऊन कोणावरही विश्वास न ठेवता रिकाम्या गाडीचे वजन करताना समक्ष शेतकऱ्यांनी हजर राहणे गरजेचे   असून यामुळे "व्यापारी तुपाशी आणि शेतकरी उपाशी "असे घडत आहे याला आळा घालण्यासाठी शेतकऱ्यांनी सतर्क राहणे काळाची गरज आहे असे आव्हान जनशक्ती शेतकरी संघटनेचे अतुल खूपसे पाटील यांनी केले आहे.
 
000

About The Author

Advertisement

Latest News

सातारा पोलीस दलासाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव? सातारा पोलीस दलासाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव?
सातारा, प्रतिनिधि  सातारा शहराची वाढती लोकसंख्या गुन्हेगारी वाहतूक समस्येच्या पार्श्वभूमीवर येत्या काळामध्ये सातारा पोलिस दलात किमान पहिल्या टप्प्यात ४००० नव्या...
मन की बात" मध्ये जुन्नरच्या रमेश खरमाळे यांच्या कामाचा गौरव
कळंब येथे आंबेडकर स्मारक उभारणार - गौतम खरात  
भाजपचे आमदार अमित गोरखे यांची महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 'तालिका सभापती' पदी निवड!
चाकण औद्योगिक परिसरात मिनी कार्गो एअरपोर्ट उभारण्यासाठी हवाई वाहतूक मंत्री यांना निवेदन!
शेतकऱ्यांचा काटा मारणाऱ्या केळी व्यापाऱ्यांचा काटा काढू - अतुल खूपसे पाटील
रत्नप्रभादेवी मोहिते पाटील बीज उत्पादक सह संस्थेच्या तज्ञ संचालक पदी पंडित मिसाळ!

Advt