मन की बात" मध्ये जुन्नरच्या रमेश खरमाळे यांच्या कामाचा गौरव

मन की बात

जुन्नर : पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांचे २९ जून रोजी झालेल्या 'मन की बात' या कार्यक्रमात पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील रमेश खरमाळे यांनी केलेल्या पर्यावरण रक्षणाच्या कामाचा गौरवपूर्ण उल्लेख केला.

 

या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी म्हणाले की, या महिन्यात आपण जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अनेक उपक्रम केले. अनेकांनी आपल्या परिसरातील पर्यावरण रक्षणासाठी एकट्याने प्रयत्न करणाऱ्या लोकांची माहिती दिली. पुणे जिल्ह्यातील रमेश खरमाळे यांनी पर्यावरण रक्षणासंदर्भात केलेले कार्य अत्यंत प्रेरणादायी आहे. आठवड्याच्या अखेरीस जेव्हा बहुतेक लोकं घरी बसून आराम करणे पसंत करत असतात तेव्हा रमेश खरमाळे आणि त्यांचे कुटुंबीय कुदळ, फावडे घेऊन घराबाहेर पडतात. खरमाळे कुटुंबीय जुन्नर परिसरातील डोंगरांमध्ये जातात आणि जमिनीत पाणी मुरवण्यासाठी चर खणतात, बिया लावतात. फक्त २ महिन्यांमध्ये त्यांनी ७० चर खणले आहेत. खरमाळे यांनी अनेक लहान लहान तळी तयार केली आहेत, शेकडो झाडे लावली आहेत. श्री. खरमाळे हे एक ऑक्सिजन पार्क देखील उभारत आहेत. या सगळ्याचा परिणाम असा झाला की या भागात पक्षी परतू लागले आहेत. वन्यजीवनाला नवीन आयुष्य लाभले आहे.

 

000

About The Author

Advertisement

Latest News

Advt