आझम कॅम्पसमध्ये वृक्षारोपण उपक्रम उत्साहात
'ग्रीन कॅम्पस'साठी पुढाकार
On
पुणे :
आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर २७ मे २०२५ रोजी महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी आणि डॉ. पी. ए. इनामदार युनिव्हर्सिटी यांच्या वतीने आझम कॅम्पस (कॅम्प, पुणे) येथे वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या उपक्रमाचा प्रारंभ सकाळी ११ वाजता करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्षा आणि एमएमई अॅण्ड आरसीच्या अध्यक्षा आबेदा पी. इनामदार, एमसीई सोसायटीचे सचिव इरफान जे. शेख आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमात एमसीई सोसायटीच्या सर्व गव्हर्निंग बोर्ड सदस्यांची, एचजीएम आजम एज्युकेशन ट्रस्ट, एमएमईआरसी, डेक्कन मुस्लिम इन्स्टिट्यूटचे विश्वस्त, अवामी महाजचे सदस्य तसेच आझम कॅम्पसमधील सर्व संस्थांचे प्राचार्य यांची विशेष उपस्थिती लाभली.
पर्यावरण जागरूकता वाढवण्यासाठी आणि हरित परिसर निर्मितीसाठी आयोजित या उपक्रमात विद्यापीठाच्या विविध विभागांतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला. आझम कॅम्पसच्या परिसरात विविध प्रकारची वृक्षलागवड करण्यात आली, ज्यामध्ये औषधी, छायादार आणि फुलझाडांचा समावेश होता.अबेदा इनामदार यांनी या उपक्रमाच्या निमित्ताने पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकल्याचे सांगून विद्यार्थ्यांना सातत्याने अशा उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले.संपूर्ण कार्यक्रम प्रेरणादायी वातावरणात पार पडला आणि उपस्थितांनी पर्यावरणपूरक जीवनशैलीचा स्वीकार करण्याचा निर्धार व्यक्त केला.
000
About The Author
Related Posts
Latest News
28 May 2025 15:47:07
बारामती, प्रतिनिधी
भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी पृथ्वीराज साहेबराव जाधव यांची तर उपाध्यक्षपदी कैलास रामचंद्र गावडे यांची...