- राज्य
- '... नाहीतर अशा लोकांची पूजा घालायची का?'
'... नाहीतर अशा लोकांची पूजा घालायची का?'
आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीन चालकाला चोपले
मुंबई: प्रतिनिधी
निकृष्ट दर्जाचे जेवण दिल्याबद्दल शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आकाशवाणी आमदार निवासात कॅन्टीन चालविणाऱ्याला मारहाण केली. यापूर्वी देखील असे प्रकार घडले असून त्याची पुनरावृत्ती होत असेल तर अशा लोकांची पूजा घालायची का, असा सवाल करीत गायकवाड यांनी मारहाणीचे समर्थन केले आहे.
या घटनेबाबत सांगताना गायकवाड म्हणाले की, आपण साधारण साडेपाच वर्षापासून मुंबईत आहोत. जेवायला सहसा बाहेर जात नाही. त्यामुळे नेहमीप्रमाणे आमदार निवासच्या कॅन्टीनमधून डाळ, भात, चपाती, भाजीचे जेवण मागविले. पहिला घास खाताच आपल्याला शिसारी आली. दुसरा घास खाताच उलटी झाली.
डाळीला दुर्गंधी येत होती. भात किमान तीन दिवस शिळा असावा. हा प्रकार प्रथमच घडलेला नाही. यापूर्वी तीन चार वेळा असं अनुभव आलेला आहे. त्या प्रत्येक वेळी कॅन्टीन चालकाला योग्य शब्दात समज दिली होती. मात्र, तरीही हे प्रकार थांबत नसतील, मराठी आणि हिंदीत सांगून कॅन्टीन चालकाला कळत नसेल तर त्याला समजेल अशा भाषेत सांगणे गरजेचेच होते, असे गायकवाड म्हणाले.