- राज्य
- नोटरी असोसिएशनच्या मावळ तालुकाध्यक्षपदी ॲड.अभिजीत जांभुळकर यांची निवड
नोटरी असोसिएशनच्या मावळ तालुकाध्यक्षपदी ॲड.अभिजीत जांभुळकर यांची निवड
वडगाव मावळ/ प्रतिनिधी
महाराष्ट्र अँड गोवा नोटरी असोसिएशनच्या मावळ तालुकाध्यक्षपदी ॲड अभिजीत जांभुळकर यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष आमदार अण्णा बनसोडे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले
ॲड.अभिजीत जांभुळकर हे गेली १८ वर्षे विधी व्यवसायात कार्यरत आहेत. त्यांच्या सामाजिक व कायदा क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन प्रदेशाध्यक्ष ॲड. सय्यद सिकंदर अली यांच्या सूचनेनुसार ही निवड करण्यात आली. यावेळी असोसिएशनचे कार्याध्यक्ष ॲड.यशवंत खराडे, सचिव ॲड. प्रवीण नलावडे तसेच प्रवक्ता ॲड अतिश लांडगे यांची ही निवड करण्यात आली आहे आहे.
यावेळी ॲड. दिनकर बारणे, प्रदेश सदस्य ॲड. शंकरराव वानखेडे, प्रदेश प्रवक्ता,ॲड. वैभव कर्वे अध्यक्ष खेड वकील संघटना, ज्येष्ठविधीज्ञ अँड मयूर लोढा, ॲड. सचिन नवले, ॲड. गणेश जगताप, ॲड. प्रताप मेरुकर, ॲड. योगेश थंबा,ॲड. गुरुप्रसाद शिवलकर, ॲड. तेजस्विनी परमाने पवार हे उपस्थित होते.
About The Author
