Barti News | बार्टीच्या विद्यार्थ्यांचे जेईई ॲडव्हान्स परीक्षेत मध्ये यश

देशातील नामवंत IIT संस्थांमध्ये प्रवेश मिळण्याचे निश्चित झाले

Barti News | बार्टीच्या विद्यार्थ्यांचे जेईई ॲडव्हान्स परीक्षेत मध्ये यश

पुणे: सामाजिक न्याय विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे मार्फत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना JEE व NEET परीक्षेच्या पूर्वतयारी करिता पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, लातूर, व नागपूर येथे खाजगी प्रशिक्षण केंद्रामार्फत सन 2023-25 करीता अकरावी व बारावी असे दोन वर्षे कालावधीचे प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आले.

नुकत्याच प्रकाशीत झालेल्या JEE Advance परीक्षेच्या निकालामध्ये नागपूर विभागातून शिवम टेंभुर्णेकर, तनिषा दिनेश राक्षे, साक्षी संजय नागरे, सोनल प्रवीण टेंभुर्णे, रचित नंदकिशोर वानखेडे, अजिंक्य भरत मानवटकर, रशिका गुलाब धवसे, जस्मिन सुरेश खांडेकर, लातूर विभागातून - साक्षी शिवराम ढेंबरे, नडगम पियुष खाजप्पा, तृप्ती मारुती घोडके, कांबळे शिवानी महादेव,  नाशिक विभागातून - भाविक योगेश गोहिल, यश गौतम सोनवणे, कौस्तुभ आशुतोष साळवे, अभिषेक जनार्दन आहेर, पुणे विभागातून - हर्षवर्धन विठू नरसुडे, प्रणव संजय जोगदंड,  व छत्रपती संभाजीनगर विभागातून - सागर प्रकाश जाधव असे एकूण 19 विद्यार्थ्यांनी पहिल्याच प्रयत्नात चांगल्या रॅन्क सह यश संपादीत केलेले आहे. त्यामुळे देशातील नामांकीत आय.आय.टी. सारख्या ख्यातनाम व प्रतिष्ठित संस्थामध्ये बार्टीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चत झाल्याचेच दिसून येत आहे.

जेईई ॲडव्हास परीक्षेतील यशाबद्दल मा. मंत्री संजयजी शिरसाट, सचिव डॉ. हर्षदीप कांबळे तसेच बार्टीचे महासंचालक सुनील वारे, निबंधक श्रीमती इंदिरा अस्वार यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

000

हे पण वाचा  निलेश चव्हाण याला 3 जून पर्यंत पोलीस कोठडी

About The Author

Advertisement

Latest News

'भारत-पाक संघर्षात विजयाची संधी का दवडली?' 'भारत-पाक संघर्षात विजयाची संधी का दवडली?'
पुणे : प्रतिनिधी भारत - पाकिस्तान संघर्षादरम्यान भारताने पाकिस्तानला धडा शिकवायची संधी का दवडली? पाकिस्तानवर वर्चस्व मिळवण्याची संधी का सोडली,...
शिव शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा स्मरण करून सर्वांनी पुढे गेले पाहिजे-उपमुख्यमंत्री अजित पवार
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी दिली बार्टी संस्थेस भेट
दिव्यांगाची परवड थांबणार कधी; दिव्यांग व्यक्ती संघटनेचे पदाधिकारी ज्ञानदेव कदम!
नॅशनल पार्क झोपडीवासीयांचा वनवास २५ वर्षे झाली तरी संपेना 
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन साजरा  
स्वेच्छेने केलेल्या धर्मांतराला विरोध नसावा: सरसंघचालक

Advt