रमाईच्या संघर्षमय पैलूंना बार्टी उजाळा देणार - सुनील वारे 

रमाईच्या संघर्षमय पैलूंना बार्टी उजाळा देणार - सुनील वारे 

पुणे -- दिनांक २७ मे त्यागमूर्ती माता रमाईचा  संघर्ष मोठा असून महापुरुषांच्या यशात त्यांच्या सहचरणीचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण असून माता रमाईच्या जीवनातील संघर्ष त्याग आणि कठीण परिस्थितीतूनही त्यांनी  महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहुन दिलेली साथ  यामुळेच  महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर घडले. 

माता रमाईच्या जीवनातील अनेक संघर्षमय आठवनी आणि त्यांचे विविध पैलू बार्टी रमाई संशोधन प्रकल्पाद्ववारे उलगडणार असल्याचे मत बार्टी संस्थेचे महासंचालक सुनील वारे यांनी रमाईच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात बोलतांना व्यक्त केले. डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे येथे दिनांक २७ मे २०२५ रोजी माता रमाईच्या स्मृतीदिनानिमित्त माता रमाई व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मा महासंचालक वारे यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी अभिवादन करताना मा महासंचालक म्हणाले की,  डॉ बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक पातळीवरचे महान नेते होते.त्यांचे व्यक्तिमत्व हे हिमालयासारखे उत्तुंग होते. रमाईने आयुष्यभर दुःखाशी संकटाशी संघर्ष केला. आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत लेखक ज. वि.  पवार  यांच्या मार्गदर्शनाखाली बार्टी रमाईच्या जीवनातील संघर्षमय आठवणी रमाई संशोधन प्रकल्पाद्ववारे संग्रही करून उलगडणार असुन संशोधन विभागाच्या वतीने रमाई प्रकल्प सुरू असल्याचे सांगून त्यांनी रमाईच्या स्मृतीस अभिवादन केले. 

WhatsApp Image 2025-05-27 at 5.17.41 PM

हे पण वाचा  '... तर राहुल गांधी यांच्या तोंडाला काळे फासू'

वाडिया महाविद्यालया समोरिल महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकातील रमाईच्या पूर्णाकृती पुतळ्यास मा महासंचालक वारे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी अध्यक्ष विठलदादा गायकवाड, माजी उपमहापौर श्रीमती सुनिताताई वाडेकर,मा नगरसेविका लताताई राजगुरू, परशुराम वाडेकर यांच्या हस्ते मा महासंचालक यांना पंचशीलेची शाल व ग्रंथ भेट देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी  निबंधक इंदिरा अस्वार, विभागप्रमुख स्नेहल भोषले, उमेश सोनवणे, अनिल कांरडे, दादासाहेब गिते, यांच्यासह बार्टी संस्थेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सुत्रसंचलन रामदास लोखंडे यांनी केले. आभार वैशाली खांडेकर यांनी मानले.

000

About The Author

Advertisement

Latest News

छत्रपती कारखान्याच्या अध्यक्षपदी पृथ्वीराज जाचक! छत्रपती कारखान्याच्या अध्यक्षपदी पृथ्वीराज जाचक!
बारामती, प्रतिनिधी  भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी पृथ्वीराज साहेबराव जाधव यांची तर उपाध्यक्षपदी कैलास रामचंद्र गावडे यांची...
उपमुख्यमंत्री पवार यांचा "माळेगाव" कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल!
हातवळण च्या शुभम गोगावले यांचे पोल्ट्री शेड अवकाळी पावसात जमीनदोस्त
'भीमनगर वासीयांची  फसवणूक होऊ देऊ नका'
...संकटमोचक!
अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील त्रुटींबाबत;  हिंदू महासंघाचे शिक्षणमंत्र्याना निवेदन 
'... तर राहुल गांधी यांच्या तोंडाला काळे फासू'

Advt