- राज्य
- विद्यार्थ्यांना पहिलीपासून देण्यात येणार सैनिकी प्रशिक्षण
विद्यार्थ्यांना पहिलीपासून देण्यात येणार सैनिकी प्रशिक्षण
शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची घोषणा

नाशिक: प्रतिनिधी
लहानपणापासूनच विद्यार्थ्यांमध्ये देश प्रेमाचे आणि राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण व्हावी यासाठी पहिलीपासून विद्यार्थ्यांना मूलभूत सैनिकी प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केली. या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासून देश प्रेमाचे आणि राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण व्हावी, शिस्त निर्माण व्हावी आणि व्यायाम व्हावा या दृष्टीने विद्यार्थ्यांना पहिलीपासून लष्करी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यातील अडीच लाख माजी सैनिकांची मदत घेण्यात येणार आहे, असे भुसे यांनी सांगितले.
नाशिक जिल्ह्यातील शिक्षकांना शालेय अभ्यासक्रमाची माहिती घेण्यासाठी सिंगापूर दौऱ्यावर पाठविण्यात आले होते. सिंगापूर येथे मुलांमध्ये 'राष्ट्र प्रथम' ही भावना बुजवण्यासाठी लहानपणापासून सैनिकी शिक्षण देण्याची प्रथा असल्याचे निरीक्षण या दौऱ्यावरील शिक्षकांनी नोंदविले. त्यानुसारच राज्यामध्ये पहिलीपासून सैनिकी शिक्षण देण्याची संकल्पना राबविण्यात येणार आहे, असे भुसे यांनी सांगितले.
About The Author
Latest News
