- राज्य
- महिला मृत्यू प्रकरणी पालिके विरोधात मनसे आक्रमक!
महिला मृत्यू प्रकरणी पालिके विरोधात मनसे आक्रमक!
मुंबई / रमेश औताडे
महानगरपालिका रुग्णालयात रुग्णांच्या अनेक तक्रारी वाढल्या असतानाच एका गर्भवती महिलेचा जीव गेल्याने डॉक्टर, प्रशासन व कर्मचारी यांच्या कर्तव्याबाबत प्रश्नचिन्ह झाले आहे.
नवी मुंबई महानगर पालिकेच्या निष्काळजी कारभारावर मनसे स्टाईल आंदोलन करत प्रशासन, डॉक्टर, कर्मचारी यांच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी केली होती. मात्र पोलिस व पालिका आयुक्त या प्रकरणी गंभीर नसल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई विभाग अध्यक्ष सागर विचारे यांनी केला आ
संगीता खरात यांचा मृत्यू सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचं निर्घृण अपयश आहे. त्यांची प्रकृती गंभीर असतानाही वेळेवर योग्य डॉक्टर उपलब्ध का झाले नाहीत ? नर्सिंग स्टाफने वेळेत माहिती दिली का ? वेळेत माहिती दिली असेल तर, डॉक्टरांना विलंब का झाला ? असे सवाल सागर विचारे यांनी केले आहेत.
पालिकेच्या उपचारातील त्रुटीमुळे संगीता खरात यांना खाजगी रुग्णालयात शिफ्ट केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्यानंतर तब्बल दोन लाख हुन जास्त रुपयांचं बिल वसूल करण्यात आले. संगीता खरात यांची प्रसूती नेमकी कोणत्या डॉक्टरने केली? डॉक्टर ने केली की इतर कर्मचाऱ्यांनी केली ? संगीता खरात यांची प्रकृती खालावली तेव्हा कोण डॉक्टर ड्युटीवर होते आणि त्यांनी तिला कधी पाहिलं ? नर्सिंग स्टाफने डॉक्टरांना माहिती कधी दिली? हिरानंदानी फोर्टिस या खाजगी रुग्णालयात नेण्याचा निर्णय कोणी घेतला? आणि कुटुंबियांना त्याची माहिती कधी दिली गेली? एवढंच नव्हे, तर या प्रकारात कोणती चौकशी समिती नेमण्यात आली आहे.अहवाल कधी येणार आहे. असे सागर विचारे यांनी सवाल केले आहेत.
गरिबांच्या जिवाचं बिल बनवणाऱ्या या यंत्रणेला जर वेळेत रोखलं नाही, तर उद्या आणखी किती संगीता खरात आपल्याला गमवाव्या लागतील. ही लढाई फक्त एका महिलेच्या मृत्यूची नाही. असे सांगत मनसेने तीव्र जनआंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. संगीता खरात यांच्या मृत्यू साठी जबाबदार यंत्रणेतील दोषींना तुरुंगात पाठवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. रजिस्टर मध्ये ‘मृत’ असं लिहून सर्व प्रकरण शांत करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही. संगीता खरात यांच्या मृत्यूचा सर्व हिशोब मनसे करणार असून सामाजिक न्यायाची हि लढाई अशीच सुरू ठेवणार आल्याचे सागर विचारे यांनी सांगितले.
000