कुख्यात गुंड बंडू आंदेकर यांच्या घरावर छापा

पुणे पोलिसांची मध्यरात्री कारवाई

कुख्यात गुंड बंडू आंदेकर यांच्या घरावर छापा

पुणे प्रतिनिधी 

कुख्यात गुंड बंडू आंदेकर यांच्या घरावर पुणे पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकला. यावेळी 67 लाख रुपये किमतीचे दागिने, दोन लाखाची रोकड आणि गाड्या व जमिनीच्या व्यवहारांची, बँक व्यवहारांची कागदपत्र, मालमत्तेच्या पावत्या, करारनामे पोलिसांनी जप्त केली आहेत. 

गृहकलहातून आपलाच नातू आयुष उर्फ गोविंद गणेश कोमकर (वय 19) याचा खून केल्याचा आरोप बंडू आदेकर याच्यावर आहे. आंदेकर टोळीवर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.

मागच्या वर्षी माजी नगरसेवक वनराज आंदेकर याचा खून झाला होता. याप्रकरणी आयुषचे वडील गणेश कुमकर हे अटकेत आहेत. आंदेकर टोळीने आयुषचा खून करून वनराजच्या खुनाचा बदला घेतला आहे. वनराज हा आयुषचा मामा तर बंडू आंदेकर हे आजोबा आहेत. 

हे पण वाचा  भरतनाट्यमपासून चित्रकलेपर्यंत, एक जिद्दीचा प्रवास

About The Author

Advertisement

Latest News

Advt