Vadgaon Maval मावळ तालुक्यातील विविध विकासकामांचा खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून आढावा

विकासकामांमध्ये शासकीय यंत्रणांनी अधिक गतीने आणि समन्वयाने काम करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना

Vadgaon Maval मावळ तालुक्यातील विविध विकासकामांचा खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून आढावा

वडगाव मावळ/सतिश गाडे 

मावळ तालुक्यातील शासकीय यंत्रणा यांनी व लोकप्रतिनिधी  अधिकारी यांच्यात समन्वय साधावा आणि त्यातून विकासकामांना गती द्यावी, अशी अपेक्षा मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केली. खासदार बारणे यांच्याकडून मावळ मतदारसंघातील विकासकामांचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या माध्यमातून मावळ तालुक्यातील शासकीय विभागांचा आढावा घेण्यासाठी बैठक वडगाव मावळ पंचायत समिती कार्यालयात गुरूवार (दि १२) आयोजित करण्यात आली होती.यावेळी या बैठकीला प्रांताधिकारी सुरेंद्र नवले, मावळ तहसीलदार विक्रम देशमुख, गट विकास अधिकारी  कुलदीप प्रधान, वडगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी  प्रवीण निकम, तळेगावचे मुख्याधिकारी विजय सरनाईक, लोणावळा नगरपरिषदचे मुख्याधिकारी अशोक साबळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता संजय पाटील, क्षीरसागर उप, धनराज दराडे,  वडगाव मावळ पोलीस निरीक्षक कुमार कदम,कविता पाटील, पोलीस निरीक्षक प्रभापती पाटील, पोलीस उपनिरीक्षक दिपाली पाटील, पोलीस उपनिरीक्षक विजया म्हेत्रे, कृषी अधिकारी मारुती साळे, माजी सभापती  गुलाब म्हाळस्कर, शिवसेना उपजिल्हा प्रमुख शरदराव हुलावळे, शिवसेना तालुका प्रमुख राजाभाऊ खांडभोर, शिवसेना उप तालुका प्रमुख राम सावंत, अमित कुंभार, धनंजय नवघने, देहूगाव शिवसेना शहर प्रमुख सुनील हगवणे, युवासेना उप जिल्हा प्रमुख दत्ताभाऊ केदारी, युवासेना मावळ लोकसभा अध्यक्ष विशाल हुलावळे, युवासेना तालुका प्रमुख राजेश वाघोले, माजी नगरसेविका कल्पना आखाडे, माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी, मनीषा भांगरे, नितीन कुडे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम, महसूल, कृषी, पाणीपुरवठा सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

३२ विभागांच्या कामांचा घेतला आढावा

हे पण वाचा  बारामतीतील अतिक्रमण विरोधी कारवाईचा पथविक्रेत्यांकडून निषेध 

या बैठकीत आपत्कालीन यंत्रणा, सार्वजनिक बांधकाम विभाग, पंचायत समिती, महावितरण, राज्य रस्ते विकास मंडळ, महसूल, कृषी, आरोग्य, महिला आणि बाल कल्याण, शिक्षण, वन, गृह, रेल्वे, पाणीपुरवठा, स्वच्छता, पुरवठा, जिल्हा परिषद बांधकाम, पाटबंधारे, वडगाव नगरपंचायत तळेगाव, लोणावळा  नगरपरिषद, दुय्यम निबंधक कार्यालय, आदीसह ३२ विभागांच्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

खासदार बारणे यांनी यावेळी दोन्ही तालुक्यांतील विकासकामांचा दर्जा, प्रलंबित कामे, अडथळे, उपलब्ध निधी आणि जनतेच्या तक्रारी यावर सखोल चर्चा केली. या बैठकीत अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी परस्पर समन्वयाने काम करण्यावर भर दिला. यावेळी बोलताना खासदार श्रीरंग बारणे यांनी विकासकामांमध्ये शासकीय यंत्रणांनी अधिक गतीने आणि समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. अशी अपेक्षा व्यक्त केली.

मावळ तालुक्यातील सुरू असलेल्या संबंधित रस्ते, वीज, पाणी आणि आरोग्य सेवा यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा खपवून घेतला जाणार नाही. असे सूचित केले. विशेषतः पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांवरील खड्डे तत्काळ बुजवावेत, वीजखांब आणि विद्युतपुरवठा सुरळीत राहील, याची दक्षता घ्यावी. कृषी क्षेत्रात झालेल्या नुकसानीबाबत संबंधित खात्यांनी तातडीने कार्यवाही करावी. अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.

मावळातील अवैध धंदे बंद करा

मावळातील अवैध धंदे बंद झाले पाहिजेत. धाब्यावर अवैधपणे मद्य विक्री केली जाते. मावळात एमडी ड्रग मोठ्या प्रमाणात विकले जाते. शाळांजवळ गुटखा विक्री केली जाते. त्यावर कारवाई करावी. साथीचे आजार वाढू नयेत यासाठी औषध फवारणी करावी. पावसाळ्यात होणाऱ्या आजारांपासून वाचण्यासाठी काही काळजी घ्यावी याबाबत आरोग्य विभागाने जनजागृती करावी. महावितरणने पावसाळ्यापूर्वी झाडांची छाटणी करुन घ्यावी. ज्या ठिकाणी डीपीची मागणी आहे, तेथे डीपी बसवावेत. पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होणार नाही, याची काळजी घ्यावी. जनजागृती करुन सुर्यघर आणि कुसूम योजना लोकांपर्यंत पोहचवावी. बियाणे, खतांची विक्री चढ्या दराने होणार नाही, याची काळजी घ्यावी.  शेतकऱ्यांच्या तक्रारींवर तत्काळ कार्यवाही करावी, अशा सूचना खासदार बारणे यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

Tags:

About The Author

Satish Gade Picture

Correspondent, Vadgaon Maval

Advertisement

Latest News

मोराळे येरळा नदीवरील तात्पुरता रस्ता म्हणजे आळवा वरील पाणी मोराळे येरळा नदीवरील तात्पुरता रस्ता म्हणजे आळवा वरील पाणी
मायणी : गेले अनेक वर्षापासूनची मागणी असलेला मोराळे मायणी रस्त्यावर मोराळे येथील येरळा नदीवरील पुलाचे काम आत्यंत धिम्या गतीने सुरू...
कोरेगाव-वाठार रस्ता झाला खड्ड्याचा
तळबीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत परप्रांतीय वाढले
साताऱ्यात शिवसेनेच्या वतीने विमान अपघातग्रस्तांना भावपूर्ण श्रद्धांजली
म्हसवे जिल्हा परिषद गटात सबकुछ 'मानकुमरे'
रायसोनी कॉलेजच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागालाएनबीए मान्यता!
शास्त्रीय संगीत-नृत्य, गायनाने सजला 'गंगाधर स्वरोत्सव युव-रंग'

Advt