Satara I शाहूपुरीला ऐतिहासिक सातारा शहराचे दिमाखदार उपनगर बनवणार

आ. शिवेंद्रसिंहराजे; विविध विकासकामांचे भूमिपूजन उत्साहात

Satara I शाहूपुरीला ऐतिहासिक सातारा शहराचे दिमाखदार उपनगर बनवणार

सातारा : शाहूपुरीमधील सर्व समस्या सोडवण्यासाठी आपण नेहमीच प्राधान्य दिले आहे. सातारा पालिका हद्दवाढीत नव्याने समाविष्ट झालेल्या शाहूपुरीला ऐतिहासिक सातारा शहराचे दिमाखदार उपनगर बनवू, अशी ग्वाही आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.

राज्य शासनाकडून हद्दवाढ भागासाठी मंजूर केलेल्या ४८ कोटी निधीतून शाहूपुरी परिसरातील केल्या जाणाऱ्या  विविध विकासकामांच्या शुभारंभ प्रसंगी आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी भारत भोसले, ग्रा.पं.सदस्य राजेंद्रकुमार मोहिते, नवनाथ जाधव, सुहास वहाळकर, सौ.शोभाताई केंडे, सौ.निलमताई देशमुख, सौ.माधवीताई शेटे, युवा नेते अक्षय जाधव, तुषार जोशी, माजी उपसरपंच सतीश सुर्यवंशी, विकास देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

shahupuri-vikas-kame1

शहर हद्दवाढ परिसराच्या विकासासाठी राज्य शासनाच्यावतीने वतीने मंजूर रक्कम रुपये ४८ कोटींच्या निधीतून तसेच आमदार फंडातून शाहूपुरी भागातील नवीन प्रभाग रचनेनुसार प्रभाग क्रमांक १,,९ व १० अंतर्गत विविध रस्ते, गटर्स, साकव पूल, स्ट्रीट लाईट प्रकल्प व उद्यान विकास प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले.

हे पण वाचा  'हिंदी बनली मुंबईची बोलीभाषा, तीच आमची लाडकी बहीण'

यावेळी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी शाहूपुरीतील ३.५ कोटींच्या उद्यान प्रकल्पाचा विशेष उल्लेख करुन सातारा शहरातील एक दर्जेदार बहुउद्देशीय प्रकल्प म्हणून या प्रकल्पाकडे पाहता येईल, असे सांगितले. या अंतर्गत लहान मुले, महिला ते ज्येष्ठांपर्यंत उपयुक्त अशा सर्व सुविधा असणार आहेत याचबरोबर उच्चतम दर्जाचा स्विमिंग टॅंक निर्मितीचा सुध्दा यात समावेश असून जेष्ठ नागरिक सभागृहही अंतर्भाव आहे. तसेच १ कोटीहून अधिक अंदाजपत्रकीय रक्कमेचा शाहूपुरीवासियांचा जिव्हाळ्याचा आंबेदरे रस्त्याचा प्रश्नही मार्गी लागल्याचे विशेष समाधान असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे जिथे जाईल तिथे माता-भगिनी व जेष्ठ नागरिकांनी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचेशी अगदी खुल्या वातावरणात आपल्या अडचणी तोंडी व लेखी निवेदनाद्वारे सांगीतल्या. त्या सर्व अडचणी ऐकून आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी जागेवरच पालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगून विविध निराकरण केले. यावेळी गुलाब भोसले, अजित कदम, नितीन तरडे, निलेश धनावडे, राजेंद्र केंडे, प्रा.डॉ.सुजीत जाधव, रमेश इंदलकर, नरेश जांभळे, विश्वजीत बालगुडे, महेश जांभळे, महेंद्र गायकवाड, दीपक अवकीरे, निखिल प्रभाळे, संदीप किर्दत, अमर इंदलकर, निखिल भोसले, सतीश मर्ढेकर, चंद्रकांत फडतरे, शिवानाना, खापे, प्रा.सी.टी.पवार, सचिन कांबळे, नवनाथ शिंदे, सुरेश चव्हाण, दिलीप चव्हाण, सौ.अलका उजगारे, हणमंतराव पालेकर, संतोष निकम, प्रविण औसिकर, दादा तगारे,तात्या चोरगे, सुरेश पांढरपट्टे, अनिल पोळ, मनोज कडव, बाळासाहेब निकम, अनिकेत जगताप, सुरेश शेटे, दिनेश शेटे, सुरेश शिंगटे, संकेत परामणे, सतीश इंदलकर, समीर खरात, अमर जाधव, कमलेश जाधव, अक्षय भोसले, शंकर भोसले, गणेश वाघमारे, ऐश्वर्य रजपूत व समस्त शाहूपुरीवासिय बहुसंख्येने उपस्थित होते.

000

Tags:

Advertisement

Latest News

'भारत-पाक संघर्षात विजयाची संधी का दवडली?' 'भारत-पाक संघर्षात विजयाची संधी का दवडली?'
पुणे : प्रतिनिधी भारत - पाकिस्तान संघर्षादरम्यान भारताने पाकिस्तानला धडा शिकवायची संधी का दवडली? पाकिस्तानवर वर्चस्व मिळवण्याची संधी का सोडली,...
शिव शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा स्मरण करून सर्वांनी पुढे गेले पाहिजे-उपमुख्यमंत्री अजित पवार
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी दिली बार्टी संस्थेस भेट
दिव्यांगाची परवड थांबणार कधी; दिव्यांग व्यक्ती संघटनेचे पदाधिकारी ज्ञानदेव कदम!
नॅशनल पार्क झोपडीवासीयांचा वनवास २५ वर्षे झाली तरी संपेना 
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन साजरा  
स्वेच्छेने केलेल्या धर्मांतराला विरोध नसावा: सरसंघचालक

Advt