२३९ भावी मेहरबाणांच्या भवितव्याचे वाजले बिगुल
जिल्ह्यात १० पालिकांसाठी द्वि सदस्य प्रभाग रचना
सातारा : सातारा जिल्ह्यातील दहा नगरपालिकांच्या २३९ भावी नगरसेवकांच्या निवडीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होणार असून याबाबतच्या मार्गदर्शक सूचना जाहीर झाल्या आहेत. प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर होऊन निवडणूक प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. जिल्ह्यातील १० नगरपालिकेमधील १२६ प्रभागाचे २३९ नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत.
सातारा जिल्ह्यातील ९ नगरपालिका व मेढा नगरपंचायतीचा पंचवार्षिक कार्यकाल पूर्ण झाला आहे. राज्यातील सत्ता बदल व ओबीसी आरक्षण व अन्य कारणांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सातत्याने लांब घेऊन गेल्या. प्रभाग रचना फेर आरक्षण वाढू नये या निवडणुका अनिश्चित कालावधीसाठी स्थगित करण्यात आल्या होत्या. २२ जानेवारी २०२३ रोजी २०१७ ची जनसंख्या गृहीत धरून निवडणूक कार्यक्रमाला गती देण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले होते त्यामुळे निवडणूक प्रक्रियेला गती आली आहे. याचे प्राधिकृत अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी यांना अधिकार देण्यात आले आहेत. प्रारूप प्रभाग रचना तयार करणे निवडणूक आयुक्त यांच्याकडे मान्यतेसाठी पाठवणे प्रारूप प्रभाग रचनेला मान्यता प्रभाग रचना प्रसिद्धी हरकती व सूचना मागवणे सुनावणीच्या अहवालासह अंतिम प्रभाग रचना निश्चित करणे त्याची प्रसिद्धी असे विविध टप्पे यामध्ये असणार आहेत. सातारा जिल्ह्यातील १० नगरपालिकांचा हा निवडणूक कार्यक्रम यापूर्वीच निश्चित झाला आहे मात्र फेर प्रभाग रचना करायची का या संदर्भात अध्यादेशामध्ये स्पष्टता देण्यात आलेले नाही.
सातारा जिल्ह्यातील एकमेव अ वर्ग नगरपालिकेत साताऱ्याच्या २५ प्रभागासाठी ५०, कराडमध्ये १४ प्रभागांसाठी २९, फलटणमध्ये १३ प्रभागांसाठी २७, वाईमध्ये १० प्रभागांसाठी २०, मलकापूरमध्ये ९ प्रभागांसाठी १९, महाबलेश्वरमध्ये १० प्रभागांसाठी २०, पाचगणीमध्ये ८ प्रभागांसाठी १७, रहिमतपूरमध्ये १० प्रभागासाठी २०, म्हसवडमध्ये १० प्रभागांसाठी २०, मेढ्यामध्ये १७ वार्डांसाठी १७ अशा एकूण १२६ जागांसाठी २३९ उमेदवार निवडून द्यायचे आहेत.
000000