घोडेगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालयात महिलेचा विनयभंग!

घोडेगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालयात महिलेचा विनयभंग!

मंचर, प्रतिनिधी

घोडेगाव ता.आंबेगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी करण्यासाठी गेलेल्या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी दुय्यम निबंधक अधिकारी शरदचंद्र वाव्हळ यांच्यावर घोडेगाव पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत घोडेगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की फिर्यादी तडवळे येथील महिला गुरुवार दि. ५ रोजी दुय्यम निबंधक कार्यालय येथे दस्त नोंद करण्यासाठी गेली असता शरदचंद्र वाव्हळ यांनी त्यांचा हात पकडत त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले असल्याचे फिर्यादीने सांगितले असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान याबाबत शरदचंद्र वाव्हळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी माझ्यावर चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माझ्या कार्यालयात दस्त नोंदणी करण्यासाठी आलेल्या महिलेने सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये काही त्रुटी होत्या. त्या त्रुटी दूर करा तरच मी दस्ताची नोंद करेल. असे मी त्यांना सांगितले. मी त्यांचे दस्त नोंद केली नाही. त्यामुळे त्यांनी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला आहे. असे वाव्हळ यांनी सांगितले.

000

हे पण वाचा  अनाथ विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि परीक्षा शुल्क पूर्ण माफ

Tags:

About The Author

Advertisement

Latest News

Advt