जुन्नर आंबेगाव, खेड, मावळ, पुरंदर व हवेली तालुक्यातील एकूण ९९ गावांचा धरती आबा जनभागीदारी अभियानामध्ये समावेश!
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी घोडेगाव प्रदीप देसाई यांची माहिती
मंचर, प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील जुन्नर आंबेगाव, खेड,मावळ, पुरंदर व हवेली तालुक्यातील एकूण ९९ गावांचा धरती आबा जनभागीदारी अभियानामध्ये केंद्र शासनामार्फत समावेश करण्यात आलेला आहे.एकूण ८५ हजार ३०४ पेक्षा जास्त आदिवासी लाभार्थ्यांना डीए-जेजीयुए अभियानांतर्गत लाभ देण्यासाठी कालबध्द कार्यक्रम निश्चीत करण्यात येत आहे.अशी माहिती घोडेगाव एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांनी दिली.
धरती आबा जनभागीदारी अभियानाच्या अनुषंगाने बुधवार दि. ११ रोजी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जिल्हा परिषद पुणे येथील मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी व इतर विभागाचे जिल्हास्तरीय अधिकारी यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. घोडेगाव एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई म्हणाले धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियाना अंतर्गत सामाविष्ट तालुक्याचे नाव,एकुण गावांची संख्या,एकुण आदिवासी कुटूंबांची संख्या,एकुण आदिवासी लोकसंख्या पुढीलप्रमाणे जुन्नर,४६,८५२८,४१३१६, आंबेगाव,२३,४८५३,२३८५९, खेड,१७,२५९३,१२४९८,मावळ,०८,९२५,
000