मानाच्या पालखी सोहळ्यासाठी भर पावसात कराडात वारकऱ्यांचे उपोषण सुरू
कराड : श्री. सदगुरु जयराम स्वामी महाराज पालखी सोहळा, श्री. मच्छींद्रनाथ पालखी सोहळा, श्री. गाडगेनाथ महाराज पालखी सोहळा, श्री. शेकोबादादा पालखी सोहळा व सध्य स्थितीत नवीन श्री. ब्रहम चैतन्य गोंदवलेकर महाराज पालखी सोहळा, श्री. सेवागीरी महाराज पालखी सोहळा तसेच संत सखु पालखी सोहळा या पालखी सोहळ्यांना मानाच्या पालखी सोहळ्याच्या यादी मध्ये समविष्ठ करा या मागणीसाठी श्री सद्गुरु जयराम स्वामी पालखी सोहळ्याच्या वतीने सोमवारी कराड तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले.
वारकऱ्यांनी सांगितले की, आषाढी वारीमधील मानाच्या दहा पालख्या शासन स्तरावर मान्यता प्राप्त झाल्या आहेत. यापुर्वी त्या सात होत्या. नंतर कोरोणा काळामध्ये यात तीन पालख्या वाढवल्या गेल्या परंतु. सातारा, सांगली जिल्हया मधील जुने २०० वार्षा पुर्वीपासुन चाललेले पालखी सोहळे श्री. सदगुरु जयराम स्वामी महाराज पालखी सोहळा, श्री. मच्छींद्रनाथ पालखी सोहळा, श्री. गाडगेनाथ महाराज पालखी सोहळा, श्री. शेकोबादादा पालखी सोहळा व सध्य स्थितीत नवीन तिस वर्षा पुर्वीपासुन चाललेले पालखी सोहळे श्री. ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज पालखी सोहळा, श्री. सेवागीरी महाराज पालखी सोहळा तसेच संत सखु पालखी सोहळा चालत असुन शाशन निर्णय १४ जुलै २०२४ रोजी शासन स्वताः कबुल करत आहे की हे पालखी सोहळे पंढरपुर मध्ये येतात. परंतु दुर्दैवाचो गोष्ट हे पालखी सोहळे मानाच्या यादीमध्ये नसल्यामुळे कोणत्याही शासनाच्या बैठकीसाठी आम्हाला बोलवले जात नाहो. तसेच प्रशासन सहकार्य करत नाही त्यामुळे वरील पालखी सोहळयांना मानाच्या यादी मध्ये समाविष्ठ करावे आमची मागणी आहे.
श्री. सदगुरु जयराम स्वामी महाराज पालखी सोहळ्याचे अध्यक्ष विठ्ठल स्वामी महाराज, मच्छिंद्रनाथ देवस्थानचे अध्यक्ष तुकाराम मटकरी खजिनदार तानाजी यादव, मच्छिंद्रनाथ दिंडीचे दिंडी चालक मल्हारी जवारे महाराज, निरंजन महाराज, पोपट चव्हाण, कृष्णत महाराज कोळेकर, संत सखु महाराज पालखी सोहळ्याचे निवेदक अंकुश जाधव, चंदू महाराज शेनोली, नाना घाडगे, संतोष घाडगे, हनुमंत महाराज आळंदीकर हे उपोषणास बसले आहेत.
दरम्यान तहसीलदार कल्पना ढवळे यांनी आंदोलकांशी चर्चा केली. पावसामुळे आत मध्ये बसून आंदोलन करण्यास सांगितले मात्र वारकरी आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. तहसील कार्यालयाच्या आवरतच त्यांनी भजन म्हणत आंदोलन सुरू केले आहे.
000000000000