राष्ट्रभाषानुरागी पतसंस्थेच्या चेअरमनपदी विजयकुमार पिसाळ बिनविरोध

राष्ट्रभाषानुरागी पतसंस्थेच्या चेअरमनपदी विजयकुमार पिसाळ बिनविरोध

मसूर : राष्ट्रभाषानुरागी शिक्षक शिक्षकेतर सेवक सहकारी पतसंस्था राष्ट्रभाषा भवन, संभाजीनगर सातारच्या चेअरमनपदी खंडाळ्याचे विजयकुमार पिसाळ, व्हा.चेअरमनपदी पाटणचे नवनाथ कदम.  सेक्रेटरीपदी सातारचे सागर पाटील यांची एकमताने बिनविरोध निवड झाली.

ही निवड निवडणूक निर्णय अधिकारी दत्तात्रय मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी राष्ट्रभाषानुरागी पतसंस्थेचे संस्थापक ता. का. सूर्यवंशी,आर.वाय.जाधव,संजय पोतेकर,शाहनवाज मुजावर, इकबाल मुल्ला, शिवाजीराव खामकर, माजी चेअरमन ह. रा. सूर्यवंशी, कुमार सोनवलकर, विजय यादव यांच्यासह शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष राजेंद्र बर्गे, सुधाकर माने, कल्याण शिंदे  प्रमुख उपस्थित होते.

निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या सत्कार प्रसंगी बोलताना संस्थेचे संस्थापक ता. का. सूर्यवंशी यांनी या संस्थेवरील सभासदांचा वाढता विश्वास व चढत्या आलेखाबाबत माहिती विशद केली.

आर. वाय. जाधव म्हणाले, राष्ट्रभाषानुरागी पतसंस्थेची प्रगती वाखाणण्याजोगी असून ता.का. सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था प्रगतीपथावर कार्यरत आहे. यावेळी. व्हा.चेअरमन नवनाथ कदम, सेक्रेटरी सागर पाटील यांनीही संस्थेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून संस्थेची प्रगती अबाधित ठेवू अशी ग्वाही दिली.  माजी चेअरमन ह. रा. सूर्यवंशी, कुमार सोनवलकर विजय यादव,संजय पोतेकर  यांनीही मनोगत व्यक्त केले.

हे पण वाचा  यशवंत विचार संपूर्ण जिल्ह्यात पोहोचवणार

संस्थापक व सभासदांनी विश्वासाने आपणावर सोपवलेली जबाबदारी पारदर्शकपणे पार पाडून  संस्था राज्यस्तरावर नावारुपास आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. सर्वांना विश्वासात घेऊनच काम करण्यास प्राधान्य देणार आहे. - विजयकुमार पिसाळ, नवनिर्वाचित चेअरमन
Tags:

Advertisement

Latest News

अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समिती सातारा जिल्हयाच्या वतीने महामोर्चा अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समिती सातारा जिल्हयाच्या वतीने महामोर्चा
वाई : अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाध्यक्ष बाळासाहेब लगस यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर आपल्या विविध मागण्यांसाठी...
पंचायत समितीच्या नूतन इमारतीत भाऊसाहेब महाराजांचे स्मारक उभारावे
राष्ट्रभाषानुरागी पतसंस्थेच्या चेअरमनपदी विजयकुमार पिसाळ बिनविरोध
प्रा. सुचेता शेळके अहिल्यारत्न पुरस्काराने सन्मानित
पहिलीच्या विद्यार्थ्यांचा बैलगाडीतून थाटामाटात प्रवेशोत्सव
प्रा. तृषाल चोरगे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून औषधनिर्माणशास्त्रातील पीएच. डी. प्रदान
एम.आय.एम.चे नेते इम्तियाज जलील यांच्या पुतळ्याचे साताऱ्यात दहन

Advt