पहिलीच्या विद्यार्थ्यांचा बैलगाडीतून थाटामाटात प्रवेशोत्सव

पहिलीच्या विद्यार्थ्यांचा बैलगाडीतून थाटामाटात प्रवेशोत्सव

डेळेवाडीत मिरवणूक; गुलाबपुष्प, गणवेश, बूट-पायमोजे, पुस्तके, मिष्ठांन्न देऊन स्वागत

कराड : डेळेवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत २०२५-२०२६ या शैक्षणिक वर्षाचा इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशोत्सव बैलगाडीतून मिरवणुकीने उत्साहात साजरा करण्यात आला. या मिरवणुकीने नवांगत विद्यार्थीही भारावून गेले.

प्रथम सकाळी ८ वाजल्यापासून इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशोत्सवास बैलगाडीतून मिरवणुकीने सुरुवात झाली. नारळाच्या झावळ्यांनी व फुग्यांनी नटवलेल्या बैलगाडीला जुंपलेली झुल घातलेली बैलजोडी,  बैलगाडीच्या पुढे ढोल ताशांच्या गजरात झांज खेळणारी चिमुकली मुले, फटाक्यांची आतिषबाजी, जरीचे लालसर फेटे बांधून बैलगाडीत दिमाखात उभा राहून शाळेत दाखल होण्यास आतुरलेले पहिलीचे बालचमू, मिरवणूकीत मान्सूनचा झिमझिम पाऊस व पेरणीचा हंगाम सुरु असताना देखील उत्साहाने सामील झालेले महिला, पुरुष पालक, प्रतिष्ठित नागरिक, समस्त ग्रामस्थ मंडळी, विद्यार्थ्यांचे ठिकठिकाणी औक्षण करणाऱ्या माता-भगिनी या सर्व दिमाखदार सोहळ्यासह मिरवणूक डामडौलात शाळेच्या प्रवेशद्वारावर दाखल झाली.

पहिलीच्या विद्यार्थ्यांचे शाळेतील पहिले पाऊल अविस्मरणीय करण्यासाठी शाळा, प्रवेशद्वाराची सजावट करण्यात आली होती. शालेय जीवनातील प्रवेश करतानाचे विद्यार्थ्यांचे पहिले पाऊलठसे कोऱ्या कागदावर घेण्यात आले. तसेच गुलाबपुष्प, नवीन गणवेश, बूट-पायमोजे, नवीन पुस्तके, फुगे देऊन औक्षण करून नवांगत विद्यार्थ्याचे स्वागत करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांनी दुपारच्या पोषण आहारात गोड मिष्टान्नाचा मनसोक्त आस्वाद घेतला.

हे पण वाचा  अहिल्यादेवींच्या विचारांनुसार महिलांनी वाटचाल करावी - आमदार रामहरी रुपनवर

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक रामचंद्र जगताप व प्रांजली जगताप, अमोल पवार, गणेश साळुंखे, एकनाथ बाबर, सर्जेराव बाबर, भरत पवार, संजय बाबर, सार्थक बाबर, राजेंद्र बाबर यांनी विशेष कष्ट घेतले.

या कार्यक्रमास सरपंच शुभांगी बाबर, ग्रा.पं. सदस्य भीमराव बाबर, लता बाबर, माया खबाले, माजी सरपंच तात्यासो बाबर, तंटामुक्ती अध्यक्ष विजय बाबर, शाळा व्यवस्थापन अध्यक्षा मोनिका बाबर, उपाध्यक्षा पूनम बाबर, व्यवस्थापन सदस्य बापूसो बाबर, आश्विनी बाबर, मनिषा बाबर, राहूल बाबर, लता बाबर, मंगेश पवार, लक्ष्मण साळुंखे, तसेच पालक व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. रामचंद्र जगताप यांनी आभार मानले.

0000000000000

Tags:

Advertisement

Latest News

अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समिती सातारा जिल्हयाच्या वतीने महामोर्चा अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समिती सातारा जिल्हयाच्या वतीने महामोर्चा
वाई : अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाध्यक्ष बाळासाहेब लगस यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर आपल्या विविध मागण्यांसाठी...
पंचायत समितीच्या नूतन इमारतीत भाऊसाहेब महाराजांचे स्मारक उभारावे
राष्ट्रभाषानुरागी पतसंस्थेच्या चेअरमनपदी विजयकुमार पिसाळ बिनविरोध
प्रा. सुचेता शेळके अहिल्यारत्न पुरस्काराने सन्मानित
पहिलीच्या विद्यार्थ्यांचा बैलगाडीतून थाटामाटात प्रवेशोत्सव
प्रा. तृषाल चोरगे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून औषधनिर्माणशास्त्रातील पीएच. डी. प्रदान
एम.आय.एम.चे नेते इम्तियाज जलील यांच्या पुतळ्याचे साताऱ्यात दहन

Advt