प्रा. सुचेता शेळके अहिल्यारत्न पुरस्काराने सन्मानित

प्रा. सुचेता शेळके अहिल्यारत्न पुरस्काराने सन्मानित

पाटण : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट, कराड व ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने पाटण तालुक्यातील मोरणा विभागातील आटोली गावच्या प्रा. सौ. सुचेता सुरेश शेळके यांना सामाजिक व शैक्षणिक कार्यातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल अहिल्या रत्न पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट व ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली यांच्यावतीने कराड येथील स्व. यशवंतराव चव्हाण स्मृती सदन येथे नुकताच पार पडलेल्या या पुरस्कार सोहळ्याला आ. रामहरी रूपनवर, ट्रस्टचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे, सांगलीचे आरटीओ इन्स्पेक्टर सौरभ दढस, श्रीसदगुरु साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब कर्णवर- पाटील, श्रीमंत योगीराज संजयसिंह गायकवाड, शाहूवाडी यांच्या प्रमुख उपस्थितीत व हस्ते पाटण तालुक्यातील मोरणा विभागातील आटोली गावच्या प्रा. सौ. सुचेता सुरेश शेळके यांना सामाजिक व शैक्षणिक कार्यातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल अहिल्या रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या पुरस्कार सोहळ्याला अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट व ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे सर्व सदस्य पदाधिकारी यांच्यासह समाजबांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

000000000000000000

हे पण वाचा  सिडने पॉईंटवरील पालिकेचा सोलर ट्री कोसळला

Tags:

Advertisement

Latest News

अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समिती सातारा जिल्हयाच्या वतीने महामोर्चा अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समिती सातारा जिल्हयाच्या वतीने महामोर्चा
वाई : अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाध्यक्ष बाळासाहेब लगस यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर आपल्या विविध मागण्यांसाठी...
पंचायत समितीच्या नूतन इमारतीत भाऊसाहेब महाराजांचे स्मारक उभारावे
राष्ट्रभाषानुरागी पतसंस्थेच्या चेअरमनपदी विजयकुमार पिसाळ बिनविरोध
प्रा. सुचेता शेळके अहिल्यारत्न पुरस्काराने सन्मानित
पहिलीच्या विद्यार्थ्यांचा बैलगाडीतून थाटामाटात प्रवेशोत्सव
प्रा. तृषाल चोरगे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून औषधनिर्माणशास्त्रातील पीएच. डी. प्रदान
एम.आय.एम.चे नेते इम्तियाज जलील यांच्या पुतळ्याचे साताऱ्यात दहन

Advt