अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समिती सातारा जिल्हयाच्या वतीने महामोर्चा
वाई : अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाध्यक्ष बाळासाहेब लगस यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर आपल्या विविध मागण्यांसाठी महामोर्चा काढण्यात आला.
या महामोर्च्यासाठी सातारा व जिल्ह्याबाहेरील समाज बांधव एकत्र आले.बावधन,वाई, सुरूर, शेंदुरजने, खंडाळा, लोणंद, लिंब, शिवथर, निगडी, कोरेगाव, बोरगाव, सातारा, मेढा फलटण, माळशिरस इत्यादी भागातील समाजबांधव उपस्थित होते.मुसळधार पाऊस पडत असताना देखील सर्व समाज बांधव एकत्र आले.पारंपारीक वाद्यांचा कडकडाट करून उत्स्फूर्त घोषणाबाजी करून महामोर्चास लक्षवेधी स्वरूप दिले.समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी सातारा ह्यांना आपल्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.सदर मोर्चाला मराठा महासंघ सातारा जिल्हा, आझाद समाज पार्टी सातारा जिल्हा आणि कामगार विकास बहुउद्देशीय सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य ह्या तिन्ही संघानी जाहीर पाठिंबा दिला.
000000000000000