प्रा. तृषाल चोरगे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून औषधनिर्माणशास्त्रातील पीएच. डी. प्रदान
वाई : पांडे (ता. वाई) येथील प्रा. तृषाल वसंतराव चोरगे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून औषधनिर्माणशास्त्रातील "विद्यावाचस्पती" (पीएच. डी.) हि सर्वोच्च पदवी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागा अंतर्गत “फार्माकोग्नोसि” या विषयात प्रदान करण्यात आली. प्रा. तृषाल चोरगे यांनी "फायटोकेमिकल अँड फार्माकोलॉजिकल इव्हॅल्यूएशन ऑफ व्हायटेक्स निगुंडो लीन. अँड इट्स पॅरासायटिक प्लांट्स" या विषयावर प्रा. डॉ. रविंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे शेठ गोविंद रघुनाथ साबळे कॉलेज ऑफ फार्मसी सासवड, पुणे येथे सखोल संशोधन केले. त्यांनी बी. फार्म. हि पदवी सातारा कॉलेज ऑफ फार्मसी, सातारा येथून तर एम. फार्म. हि पदवी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिटयूट ऑफ फार्मासुटीकल सायन्सेस अँड रीसर्च, पुणे येथून पूर्ण केली. प्रा. तृषाल चोरगे हे सध्या जे. एस. पी. एम. चे चरक कॉलेज ऑफ फार्मसी अँड रीसर्च, वाघोली, पुणे येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असून त्यांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नियत कालिकांमध्ये अनेक शोधनिबंध तसेच पेटंट्स प्रसिद्ध केले असून त्यांची दोन पाठ्यपुस्तके प्रकाशित आहेत. त्यांना "क्वlलिटी एक्सलन्स अँड रीसर्च सेंटर, पुणे" यांच्यावतीने आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
त्यांच्या या यशाबद्दल पुणे जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील, खा. नितिनकाका पाटील, जे. एस. पी. एम. चे संस्थापक सचिव मा. सार्वजनिक आरोग्य तथा कुटुंबकल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत, जे. एस. पी. एम. विद्यापीठाचे कुलपती डॉ. रवी जोशी, प्राचार्य डॉ. सागर वानखेडे, प्राचार्या डॉ. राजश्री चव्हाण, डायरेक्टर डॉ. महेश बुरांडे यांनी अभिनंदन केले.
प्रा. तृषाल चोरगे हे महाराष्ट्र शासन अतिउत्कृष्ट सेवेबद्दल सुवर्ण पदक विजेते निवृत्त वन अधिकारी श्री. वसंतराव चोरगे यांचे जेष्ठ सुपुत्र आणि सामाजिक कार्यकर्ते श्री. विशाल चोरगे यांचे जेष्ठ बंधू आहेत.
000000000000000