महाबळेश्वरचा वेण्णा तलाव मुसळधारेमुळे ओव्हरफ्लो

महाबळेश्वरचा वेण्णा तलाव मुसळधारेमुळे ओव्हरफ्लो

महाबळेश्वर : महाराष्ट्राचे नंदनवन व पावसाचे माहेरघर अशी ओळख असलेल्या महाबळेश्वरमध्ये मुसळधार पावसाने दोन तीन दिवस अक्षरशा झोडपून  काढल्या मुळे ओढे नाले तुडूंब भरून वाहू लागल्या मुळे पावसाचा जोर कायम असल्याने  शहराची जीवनदायिनी असणारा वेण्णा लेक शनिवारी पहाटे ओव्हर फ्लो झाला आहे. त्यामुळे महाबळेश्वर व पांचगणी वासियाचा  पाणी प्रश्न मिटला आहे. 
 २४ तासात ७३ मिमी २ इंच पावसाची नोंद करण्यात आली आजअखेर पर्यत  महाबळेश्वरमध्ये १ जून ते २१ जून पर्यत ९३९.८ मि मी (३७ इंच) पावसाची नोंद हवामान विभागात करण्यात आली आहे.
महाबळेश्वर मध्ये मे महिन्याच्या मुख्य हंगामात  जवळ पास अंदाजे ४५० मि मी १५ ते १८ इंच पाऊस पडला असल्यामुळे वेण्णा लेक धरणात पाण्याची पातळी वाढल्या मुळे वेण्णालेक ९३९ मि मी मध्येच पूर्ण क्षमक्षतेने ओसंडून वाहू लागला. 
गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाने दोन दिवस उसंत घेतली होती. ग्रामीण भागात मात्र पावसाची संततधार सुरूच होती.डोंगर माथ्यावरून येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहा मुळे  ग्रामीण भागातील रस्ते काही ठिकाणी खचले , वाहून गेले  या मध्ये काही ग्रामीण भागाचे संपर्क काही काळ तुटले होते शहरात  पावसाची संततधार सुरू आहे यामुळे नदी, नाले व ओढ्यांची पाणीपातळी वाढली आहे. शहराचा पिण्याच्या पाण्याचा स्रोत असणारा वेण्णा लेकही ओव्हर फ्लो झाला असून सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे.
वेण्णा तलावामधून महाबळेश्वर व पाचगणी या दोन्ही पर्यटनस्थळांना पाणी पुरवठा केला जातो. वेण्णा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने दोन्ही शहरांचा पाण्याचा प्रश्न संपुष्टात आला आहे. दरवर्षी ५० ते ५५ इंच पावसाचा टप्पा गाठला की वेण्णा तलाव भरून वाहतो. यंदा मे हंगामात पाऊस पडल्या मुळे  महाबळेश्वरवासीयांना वेगळा अनुभव आला. पावसाळी हंगाम पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकानी सांडव्यावरून जाणारे पाणी पाहण्यास गर्दी केली होती.

00000000000000000000

Tags:

Advertisement

Latest News

महाबळेश्वरचा वेण्णा तलाव मुसळधारेमुळे ओव्हरफ्लो महाबळेश्वरचा वेण्णा तलाव मुसळधारेमुळे ओव्हरफ्लो
महाबळेश्वर : महाराष्ट्राचे नंदनवन व पावसाचे माहेरघर अशी ओळख असलेल्या महाबळेश्वरमध्ये मुसळधार पावसाने दोन तीन दिवस अक्षरशा झोडपून  काढल्या मुळे...
ॲड. दादासाहेब चव्हाणच्या विद्यासंकुलातील विद्यार्थ्यांची युनायटेड किंगडमच्या विद्यापीठांत उच्च शिक्षणासाठी निवड
महाबळेश्वर नगरपालिका हददीत पर्यावरणाला धोका
पायथा वीजगृहातून १ हजार क्युसेक्स पाणी सोडले
योग जीवनाचा अविभाज्य घटक बनवा : ना. शिवेंद्रराजे
भाजप पदाधिकाऱ्यांचा सज्जनगडावर योगाभ्यास
दुगड ग्रुपच्या वतीने वारकऱ्यांना अन्नदान

Advt