पायथा वीजगृहातून १ हजार क्युसेक्स पाणी सोडले

पायथा वीजगृहातून १ हजार क्युसेक्स पाणी सोडले

कोयना धरणात ३४.८४ टीएमसी पाणीसाठा

२८ हजार ८३ क्युसेक्स पाण्याची आवक

पाटण : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पर्जन्यवृष्टी होत असल्याने धरणात २८ हजार ८३ क्युसेक्स प्रतिसेकंद पाण्याची आवक होत आहे. धरणात सध्या ३४.८४ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. धरणात येणाऱ्या पाण्याची आवक पाहता कोयना धरणाची पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी शुक्रवार, दि. २० रोजी सकाळी ९ वाजता धरणाच्या पायथा वीजगृहाचे एक युनिट सुरू करून १ हजार ५० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. धरणात सध्या ३३.१० टक्के पाणीसाठा झाला आहे.

मोठ्या प्रमाणात येणारे पावसाचे पाणी व धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

हे पण वाचा  अर्जुन कोळी यांची मिपा औरंगाबादच्या कोअर कमेटी सदस्यपदी निवड

गेल्या आठवडाभरापासून पाटणसह कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. शनिवारी सकाळी ८ वाजेपर्यंत २४ तासात कोयनानगर येथे ७८ (७६५) मिलिमीटर, नवजा येथे १०२ (८१८) मिलिमीटर आणि महाबळेश्वर येथे ९८ (७५१) मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. धरणातील पाणीपातळी २,०८५.०३ फूट आणि ६३५.५८४ मीटर इतकी झाली आहे. धरणात प्रतिसेकंद २८ हजार ८३ क्युसेक्स इतक्या पाण्याची आवक सुरू झाली आहे. ही आवक या वर्षातील पहिलीच आवक आहे. १०५.२५ टीएमसी पाणीसाठवण क्षमता असलेल्या धरणातील पाणीसाठा ३४.८४ टीएमसी इतका झाला असून धरण ३३.१० टक्के भरले आहे. गतवर्षी याच तारखेला धरणात १५.६१ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. तो आजच्या घडीला १९.२३ टीएमसीने जादा आहे तर धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी शुक्रवारपासून धरणाच्या पायथा वीजगृहाचे एक युनिट सुरू करून त्यातून १ हजार ५० क्युसेक्स पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे. सुरू असलेला जोरदार पाऊस आणि धरणातून सोडण्यात येणारे पाणी यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाल्याने नदीकाठावरील गावांना धरण व्यवस्थापनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. पाटण तालुक्याच्या कोयना, मल्हारपेठ, तारळे, ढेबेवाडी, मोरगिरी, चाफळसह सर्वच विभागात पावसाने दमदार सुरू केली आहे. संततधार पाऊस पडत असल्याने शेतीची कामे रखडली आहेत.

ooooooooooo

Tags:

Advertisement

Latest News

महाबळेश्वरचा वेण्णा तलाव मुसळधारेमुळे ओव्हरफ्लो महाबळेश्वरचा वेण्णा तलाव मुसळधारेमुळे ओव्हरफ्लो
महाबळेश्वर : महाराष्ट्राचे नंदनवन व पावसाचे माहेरघर अशी ओळख असलेल्या महाबळेश्वरमध्ये मुसळधार पावसाने दोन तीन दिवस अक्षरशा झोडपून  काढल्या मुळे...
ॲड. दादासाहेब चव्हाणच्या विद्यासंकुलातील विद्यार्थ्यांची युनायटेड किंगडमच्या विद्यापीठांत उच्च शिक्षणासाठी निवड
महाबळेश्वर नगरपालिका हददीत पर्यावरणाला धोका
पायथा वीजगृहातून १ हजार क्युसेक्स पाणी सोडले
योग जीवनाचा अविभाज्य घटक बनवा : ना. शिवेंद्रराजे
भाजप पदाधिकाऱ्यांचा सज्जनगडावर योगाभ्यास
दुगड ग्रुपच्या वतीने वारकऱ्यांना अन्नदान

Advt