भाजप पदाधिकाऱ्यांचा सज्जनगडावर योगाभ्यास
आंतरराष्ट्रीय योग दिन अनोख्या पद्धतीने साजरा
सातारा : भारतीय जनता पार्टी प्रदेश उपाध्यक्ष श्री विक्रमजी पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी सातारा तालुक्यातील श्री रामदास स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्री क्षेत्र सज्जनगड या ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त योगसाधना केली
यावेळी बोलताना श्री पावस्कर म्हणाले आपले गडकोट गडकिल्ले हीच खरी संपत्ती आहे, या ठिकाणची नैसर्गिक देणगी आणि गडकिल्ल्यांचे महत्त्व सर्वांना समजावे, गडकिल्ल्यांवर मिळणारी मानसिक शांतता सर्वांनी अनुभवावी, या ठिकाणचा ऐतिहासिक वारसा सर्वांच्या लक्षात राहावा म्हणून भारतीय जनता पार्टीने गड किल्ल्यांवर योगसाधना करण्याचा नवा उपक्रम हाती घेतला आहे,
आज सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील श्रीक्षेत्र सज्जनगड या ठिकाणी जाऊन, श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या समाधीचे दर्शन घेतले त्या ठिकाणी असलेल्या पुरातन श्री रामपंचायतन मूर्तीचे दर्शन घेतले,सज्जन गडावरील ऐतिहासिक माहिती घेतली
श्री समर्थ सेवा मंडळाचे श्री योगेश बुवा, शेवडे बुवा, शेखर बुवा आणि श्री रामदास स्वामी संस्थानचे बाळासाहेब स्वामी, रोकडे बुवा याच्या मार्फत, या दोन्ही ठिकाणी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावस्कर यांचे स्वागत , सत्कार करण्यात आला .आजच्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने सज्जनगडावर आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंबवडे खुर्द भोंदवडे या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले
यावेळी सातारा ग्रामीण दक्षिण मंडल अध्यक्ष विजय गुजर, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विकास गोसावी, जिल्हा उपाध्यक्ष, नगरसेवक धनंजय जांभळे, राहुल शिवनामे, जिल्हा संवादक प्रवीण शहाणे, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष विक्रम बोराटे, कोरेगाव विस्तारक स्वप्निल पाटील, योगशिक्षक श्री जोशी काका , सागर चव्हाण , सज्जनगडचे रहिवासी चंद्रकांत माने,शंतनु पुजारी, हणमंत शिंगरे , चंद्रकांत शिंगरे , पांडुरंग शिवारे , सुरेश जाधव, निनाद माने, बाळू माने,काका शिंगरे , शंकर जाधव आणि पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते
००००००००००००००००००