योग जीवनाचा अविभाज्य घटक बनवा : ना. शिवेंद्रराजे

योग जीवनाचा अविभाज्य घटक बनवा : ना. शिवेंद्रराजे

सातारा : योगाला पूर्वापार चालत आलेली आपली मोठी परंपरा आहे. योगा हि भारताने जगाला दिलेली देणगी आहे. योगामुळे आरोग्य चांगले राहून मनशांती मिळते. प्रत्येकाने योगासने रोज करुन आपल्या जीवनात योगाला अविभाज्य घटक बनवा, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केले.

जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी व आयुष विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकुलात योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. सुरुवातीला ना. शिवेंद्रराजे भोसले यांच्याहस्ते दिपप्रज्वलन करुन योग दिनास प्रारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी, संतोष पाटील, जिल्हा क्रीडाधिकारी नितीन तारळकर, उपविभागीय अधिकारी आशिष बारकुल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे, सहाय्यक जिल्हा आयुष अधिकारी डॉ. संजीवनी शिंदे, शिक्षणाधिकारी (माध्य) धनंजय चोपडे, जिल्हा युवा अधिकारी स्वप्निल देशमुख, गटविकास अधिकारी सतिश बुध्दे, उपशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे आदी उपस्थित होते.

ना. शिवेंद्रराजे म्हणाले, योग ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. सन 2014 च्या संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय योग दिवसांची संकल्पना मांडली. त्यामुळे संयुक्त राष्ट्राने दि. 21 जून हा अंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून घोषित केला. तेव्हा पासून 21 जून हा आंतरराष्टीय योग म्हणून जगभर उत्साहात साजरा केला जातो. रोज योगासने केल्यामुळे मनशांती बरोबर आरोग्यही चांगले राहते. हजारो वर्षांपासून परंपरा या योगाला आहे. योगासनांमुळे अनेक व्याधी बऱ्या होत आहेत. रोज योगासने करुन आपले जीवन योगामय करा, असे आवाहन केले.

जिल्हाधिकारी पाटील म्हणाले, योगामुळे प्रकृती चांगली राहते. आरोग्यदायी जीवनासाठी रोज योगासने केली पाहिजेत. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त संपूर्ण जिल्ह्यात विविध ठिकाणी योग दिनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अभय चव्हाण यांनी केले.

हे पण वाचा  सात्विक सावंत याचे नीट युजी परीक्षेत उज्जवल यश

000000000000000

Tags:

Advertisement

Latest News

महाबळेश्वरचा वेण्णा तलाव मुसळधारेमुळे ओव्हरफ्लो महाबळेश्वरचा वेण्णा तलाव मुसळधारेमुळे ओव्हरफ्लो
महाबळेश्वर : महाराष्ट्राचे नंदनवन व पावसाचे माहेरघर अशी ओळख असलेल्या महाबळेश्वरमध्ये मुसळधार पावसाने दोन तीन दिवस अक्षरशा झोडपून  काढल्या मुळे...
ॲड. दादासाहेब चव्हाणच्या विद्यासंकुलातील विद्यार्थ्यांची युनायटेड किंगडमच्या विद्यापीठांत उच्च शिक्षणासाठी निवड
महाबळेश्वर नगरपालिका हददीत पर्यावरणाला धोका
पायथा वीजगृहातून १ हजार क्युसेक्स पाणी सोडले
योग जीवनाचा अविभाज्य घटक बनवा : ना. शिवेंद्रराजे
भाजप पदाधिकाऱ्यांचा सज्जनगडावर योगाभ्यास
दुगड ग्रुपच्या वतीने वारकऱ्यांना अन्नदान

Advt