संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेसाठी शशिकांत कांबळे यांची निवड

थायलंड येथे होणार संयुक्त राष्ट्र व्यवसाय आणि मानवाधिकार मंच परिषद

संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेसाठी शशिकांत कांबळे यांची निवड

पुणे : प्रतिनिधी

संयुक्त राष्ट्राच्या वतीने थायलंड येथे आयोजित संयुक्त राष्ट्र व्यवसाय आणि मानवाधिकार मंच, आशिया-पॅसिफिक (UNRBHR २०२५)  परिषदेसाठी पुण्यातील शशिकांत कांबळे यांची निवड करण्यात आली आहे.

थायलंड येथे 16 ते 20 सप्टेंबर 2025 दरम्यान आयोजित या आंतरराष्ट्रीय परिषदेत जगभरातून विविध 70 देशातील प्रतिनिधि सहभागी होणार आहेत. या परिषदेचा हेतू संकटातून मानवी हक्कांवर प्रगतीचे आराखडा तयार करणे आणि प्रादेशिक नेतृत्व मजबूत करणे हा आहे.

शशिकांत कांबळे स्वान फाउंडेशन च्या माध्यमातून मागील अनेक वर्षे सामाजिक, शैक्षणिक आणि पर्यावरण या विषयावर काम करत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन संयुक्त राष्ट्र च्या वतीने कांबळे यांची निवड करण्यात आली आहे. शशिकांत कांबळे हे भारती विद्यापीठात जनसंपर्क अधिकारी म्हूणन ही 12 वर्ष काम करत होते. त्याच बरोबर भारतीय गुणवत्ता परिषदचे ते सदस्य म्हूणन काम करत होते.

हे पण वाचा  सी पी राधाकृष्णन हे बहुआयामी नेतृत्व: एकनाथ शिंदे

About The Author

Advertisement

Latest News

Advt