मुलींनी समाजामध्ये निर्भयपणे वागून यश संपादन करावे-नारायण पवार
लक्ष्मी-आनंदच्या विद्यार्थिनीं समाज रक्षणकर्त्यांचा राखी बांधून केला सन्मान
प्रतिनिधी | टेंभुर्णी
पोलीस कायम आपल्या सोबत आहेत. मुलींनी समाजामध्ये वावरताना निर्भयपणे वागून उतुंग यश संपादन केले पाहिजे. यातून कुटुंबासह शाळा व गावाचा नाव लौकीक वाढवला पाहिजे.अशी भावनिक आवाहन टेंभुर्णी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नारायण पवार यांनी केले. ते टेंभूर्णी येथील माऊली शिक्षण प्रसारक व समाजसेवा मंडळ संचलित, लक्ष्मी- आनंद विद्यामंदिर व ज्यु.कॉलेजच्या विद्यार्थीनींच्या वतीने समाज रक्षणकर्त्यां पोलिसांचा राखी बांधून सत्कार करण्यात आला यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.
रक्षाबंधनाचे औचित्य साधून लक्ष्मीआंनद विद्यामंदिरच्या वतीनेसद्रक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीदवाक्यांस अनुसरून सुरक्षेचे देवदूत म्हणून महिला,मुली व समाजाचे रक्षण करणारे टेंभूर्णी पोलीसांना कृतज्ञतेने विद्यार्थिनींनी पोलीस बांधवांना राखी बांधून हा अनोखा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला.
यावेळी संस्थेच्या संचालिका शाहिदा पठाण, प्राचार्य विकास करळे,सागर खुळे, प्रा.युवराज वजाळे,सहशिक्षिका गायत्री शहाणे व इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.
टेंभूर्णी ता माढा येथे लक्ष्मी- आनंद विद्यामंदिर व ज्यु.कॉलेजच्या विद्यार्थीनींच्या वतीने समाज रक्षणकर्त्यां पोलिसांचा राखी बांधून सत्कार करताना विद्यार्थीनी व पोलिस निरीक्षक नारायण पवार, विकास करळे व कर्मचारी.