- राज्य
- हजरत महंमद पैगंबर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी
हजरत महंमद पैगंबर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी
सिरत कमिटी आयोजित डिजे विरहीत मिरवणुकीचे सर्वत्र स्वागत
पुणे : प्रतिनिधी
सालाबादप्रमाणे यंदाच्या वर्षीही हजरत महंमद पैगंबर यांची जयंती पुणे शहरामध्ये मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली . यंदाचे वर्ष हे १५०० वे जयंती वर्ष असल्यामुळे यावर्षी अधिक उत्साहाने व धार्मिक प्रथा परंपरांचे पालन करत मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सिरत कमिटीच्या वतिने आयोजित केलेल्या मुख्य मिरवणुकीची सुरुवात नाना पेठेतील मन्नूशाह मशिदीपासून झाली. यावेळी सह पोलिस आयुक्त रंजन कुमार , पोलिस उपायुक्त विवेक मासाळ , मौलाना ज़मीरुद्दिन, मौलाना निजामुद्दीन फखरुद्दीन, मौलाना खालिद निजामी, मौलाना गुलाम अहमद खान , रफीउद्दिन शेख ,माजी आमदार मोहन जोशी, रिपब्लिकन सोशालिस्ट पाक्षाचे राहुल डंबाळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रशांत जगताप , माजी नगरसेवक अविनाश बागवे, डॉ. सिध्दार्थ धेंडे, सिराज बागवान, जावेद खान, आबिद सय्यद , जावेद शेख , हाजी नजीर तांबोळी , आसिफ शेख , सूफियान कुरैशी आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सह पोलिस आयुक्त रंजन कुमार म्हणाले, पुण्यातील सिरत कमिटी पदाधिकारी अत्यंत महत्वपूर्ण कामगिरी करत सामाजिक सलोखा जोपासण्याचे काम करत आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पैगंबर जयंती विसर्जन मिरवणूक संपल्यानंतर साजरी करण्याचा निर्णय कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.
संत कबीर चौक, एडी कॅम्प चौक, भारत चित्रपटगृह, पदमजी पोलिस चौकी, निशांत चित्रपटगृह, भगवानदास चाळ, चुडामण तालीम चौक, मुक्तीफौज चौक, कुरेशी मशिद, जान महंमद रस्ता, बाबाजान चौक, चारबावडी चौक, छत्रपती शिवाजी महाराज मार्केट, सेंट्रल स्ट्रीट, भोपळे चौक, पूलगेट चौक, महात्मा गांधी रस्ता, महंमद रफी चौक, कोहिनूर चौक, महावीर चौक, सरबतवाला चौक, क्वार्टर गेट चौक, संत कबीर चौक, नाना चावडी चौक, अल्पना चित्रपटगृह, हमजेखान चौक, महाराणा प्रतापसिंह रस्ता, गोविंद हलवाई चौक, सुभानशहा दर्गा चौक या मार्गांनी मिरवणूक निघून शुक्रवार पेठेतील सिटी जामा चौक येथे समाप्त झाली.
यावेळी जवळपास सर्च प्रमुख चौकांत विविध पक्ष संघटना व स्वयंसेवी संस्थांच्या वतिने मिरवणुकीचे सावागत करण्यात आले. डिजे विरहीत हि मिरवणुक निघाल्याने नागरिकांनी याचे विशेष कौतुक केले.
दरम्यान, पैगंबर जयंतीचे १५०० वे वर्ष लक्षात घेवुन सिरत कमिटीच्या वतिने शहरातील विविध भागात वरिषभर प्रबोधनात्मक कार्यक्रम केले जाणार असल्याचे सिरत कमिटीचे सिराज बागवान व जावेद शेख यांनी सांगितले.