- राज्य
- आता बंजारा समाजही आरक्षणासाठी उतरणार रस्त्यावर
आता बंजारा समाजही आरक्षणासाठी उतरणार रस्त्यावर
हैदराबाद गॅझेटियरनुसार अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्याची मागणी
बीड: प्रतिनिधी
आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाचे आंदोलन, आरक्षण वाचवण्यासाठी इतर मागासवर्गीयांचे आंदोलन याबरोबरच आता बंजारा समाजहीअनुसूचित जमाती या प्रवर्गात आपला समावेश व्हावा, या मागणीसाठी रस्त्यावर उतरणार आहे
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळणे सुलभ व्हावे यासाठी सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करणारा शासन निर्णय जाहीर केला आहे. याच गॅझेटियरनुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमातींमध्ये समाविष्ट करावे, अशी मागणी बंजारा समाजाच्या नेत्यांनी केली असून या मागणीसाठी लवकरच आंदोलन करण्यात येणार आहे.
आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यासाठी नुकतीच येथे बंजारा समाजाच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत 15 सप्टेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्याचे या बैठकीत ठरवण्यात आले. या मोर्चानंतर राज्यव्यापी आंदोलनाचे नियोजन करण्याचा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला.