- राज्य
- '... त्यांची दखलही घ्यावी असे वाटत नाही'
'... त्यांची दखलही घ्यावी असे वाटत नाही'
संजय राऊत यांचा राज ठाकरे यांच्यावर निशाणा
नाशिक: प्रतिनिधी
राज्यातील काही नेते आणि काही पक्ष यांची दखलही घ्यावी असे वाटत नाही, अशा शब्दात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर पत्रकारांशी बोलताना निशाणा साधला.
सध्याच्या काळात संविधान आणि लोकशाही वाचविण्याची आवश्यकता असताना राज ठाकरे महाराष्ट्रद्रोही सत्ताधाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. त्यामुळे प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला किती येताना होत असतील. ठाकरे घराण्यातील एक व्यक्ती त्यांच्या बरोबर आहे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे, असेही राऊत म्हणाले.
अरविंद केजरीवाल मुंबईत हजेरी लावणार
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने एक जूनपर्यंत तात्पुरता जामीन दिला आहे. त्यामुळे ते इंडिया आघाडीच्या प्रचार मोहिमेत सहभागी होणार आहेत. आघाडीच्या मुंबईतील उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या 17 तारखेच्या सभेला केजरीवाल उपस्थित राहणार आहेत. उद्धव ठाकरे यांनी केजरीवाल यांचे दूरध्वनी वरून संभाषण झाले असून त्यांनी सभेला येणार असल्याचे स्पष्ट केले आहे, असेही राऊत यांनी सांगितले
भूसंपादन घोटाळ्याचा पर्दाफाश करणार
राज्यात तब्बल 800 ते 900 कोटी रुपयांचा भूसंपादन घोटाळा झाला आहे. लवकरच आपण पत्रकार परिषदेत या घोटाळ्याचा पडदा फास्ट करणार आहोत. त्यावेळी या घोटाळ्याशी संबंधित पुरावे ही आपण सादर करू, असा दावा राऊत यांनी केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने महाराष्ट्रात सभा घेत आहेत. नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादीचा भाजपला कोणताही फायदा होत नसल्याचे त्यांच्या ध्यानात आले आहे. त्यामुळे मोदी यांनी मुंबईत भाड्याने घर घेऊन रहावे. आम्ही त्यांना ते मिळवून देऊ, अशा शब्दात राऊत यांनी मोदी यांच्या महाराष्ट्र दौऱ्याची खिल्ली उडवली.