- राज्य
- एमआयडीसी परिसरात दोन कंपन्यांना भीषण आग
एमआयडीसी परिसरात दोन कंपन्यांना भीषण आग
एका कंपनीतील सामग्री संपूर्ण जळून खाक
ठाणे: प्रतिनिधी
डोंबिवली औद्योगिक वसाहतीत आज दुपारी कापडावर प्रक्रिया करणाऱ्यl एका कारखान्याला भीषण आग लागली. ही आग पसरून तिने शेजारच्या आणखी एका कंपनीला आपल्या कवेत वेढले. कल्याण डोंबिवलीसह आजूबाजूच्या महापालिकांच्या अग्निशामक दलांच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून तुम्हाला आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
डोंबिवली एमआयडीसी फेज वन या ठिकाणी असलेल्या विश्वनाथ गारमेंट्स या कारखान्यात ट्रान्सफॉर्मरचा स्फोट होऊन आग लागली हा कारखाना कापडावर प्रक्रिया करणार असल्यामुळे कारखान्यात सर्व ज्वलनशील माल होता. त्यामुळे या अभिनेत थोड्याच वेळात भीषण स्वरूप धारण केले. थोड्याच वेळात या आगीने शेजारच्या एरोसेल कंपनीला आपल्या कवेत घेतले. विश्वनाथ गारमेंट कंपनीतील सर्व सामग्री जळून खाक झाली आहे. कंपनीतील काही कर्मचारी आत अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात असून अद्याप कोणत्याही जीवित हानीची माहिती मिळालेली नाही.
या आगीला नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशामक दलाच्या पाच गाड्या आणि दहा टँकर घटनास्थळी घटनास्थळी रवाना झाले असून अग्निशामक दलाचे जवान आग नियंत्रणात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. एमआयडीसीचे सुरक्षा रक्षक आणि स्थानिक पोलीस देखील जवानांना मदत करत आहे.